घरक्राइमडी गँगविरोधात NIAची मोठी कारवाई, दाऊदसह 'या' तिघांविरोधात आरोपपत्र दाखल

डी गँगविरोधात NIAची मोठी कारवाई, दाऊदसह ‘या’ तिघांविरोधात आरोपपत्र दाखल

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या गँगविरोधात एनआयएने मोठी कारवाई केली आहे. एनआयएने डी गँगविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. डी गँगने उकळलेल्या खंडणीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केल्याच्या आरोपाखाली एनआयएने ही कारवाई केली आहे. (NIA files charge sheet against Dawood Ibrahim Chhota Shakeel 3 others in Mumbai terror funding case)

एनआयएने यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली असून दाऊदसह आणखी काही जणांना फरार घोषित केले आहे. डी गँगमार्फत श्रीमंत लोकांकडून खंडणी उकळत ते पैसे दहशतवादासाठी वापरले जायचे. अटक केलेल्या तीनही आरोपींना हवाल्यामार्फत हे पैसे पुरवते जात होते, दरम्यान हवाल्यामार्फत मिळालेल्या पैशांचा वापर ते मुंबईत दहशवतवादी हल्ला करण्यासाठी वापरणार होते, अशी माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानुसार एनआयएने ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

डी गँगशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणात सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी हे दोघेही अटकेत आहेत. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात आता या दोघांसह दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचा समावेश केला आहे.

सलीम फ्रुट हा डी गँग आणि छोटा शकीलच्या नावाने धमकी देत खंडणी उकळत होता. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने सलीम फ्रुटविरोधात तक्रार दाखल केली, ज्यानंतर सलीम फ्रुटला अटक करण्यात आली, सलीम फ्रुटने संबंधित व्यावसायिकाला धमकावत त्याच्याकडून महागडी रेंज रोव्हर गाडी जबरदस्तीने ताब्यात घेतली होती, याशिवाय त्याने तक्रारदाराकडून 65 लाखांची रोख रक्कमही घेतली होती. याप्रकरणातील पैसे सलीमने हवालामार्गे भारताबाहेर पाठवल्याचा आरोप एनआयएने करत आरोपपत्र दाखल केले आहे.


आईवडिलांना शिव्या द्या पण मोदींना नको बोलणाऱ्यांविरोधात आपली लढाई, जयंत पाटलांची खोचक टीका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -