घरदेश-विदेशनितीश कुमारांची सोनिया गांधींशी चर्चा; काँग्रेसच्या बड्या नेत्याने सांगितली पुढची योजना

नितीश कुमारांची सोनिया गांधींशी चर्चा; काँग्रेसच्या बड्या नेत्याने सांगितली पुढची योजना

Subscribe

नितीशकुमारांची सोनिया गांधींशी चर्चा झाली आहे. याबाबत काँग्रेसच्या बड्या नेत्याने पुढची योजना सांगितली आहे.

पाटणा – बिहारमध्ये काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, JDU भाजपपासून वेगळे झाल्यास काँग्रेस नितीशकुमारांना पूर्ण पाठिंबा देईल आणि त्यांचे स्वागत करेल. खुद्द नितीशकुमार यांनीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधल्याची जोरदार चर्चा असताना हे सर्व घडत आहे. या चर्चेला अधिक महत्त्व आहे कारण सोनिया गांधी सध्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या कारवाईला सामोरे जात आहेत. भाजप आणि केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने आघाडी उघडली आहे. अशा परिस्थितीत नितीश कुमार आणि सोनिया गांधी यांच्यात संवाद झाला असेल तर ती मोठी गोष्ट आहे. तथापि, जेडीयू किंवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने अशा कोणत्याही चर्चेला दुजोरा दिलेला नाही किंवा ही चर्चा नाकारलेली नाही.

नितीश यांनी आमच्यासोबत यावे आणि मुख्यमंत्री व्हावे – काँग्रेस  

- Advertisement -

बिहारमध्ये झपाट्याने बदलत असलेल्या घडामोडींदरम्यान काँग्रेसचे सचिव आणि आमदार शकील अहमद खान यांनी नितीश कुमार हे सार्वत्रिक नेते आहेत. त्यांनी भाजप सोडली तर त्यांनी आमच्यासोबत यावे. येथेही मुख्यमंत्री व्हावे. त्यांना आमचा पाठिंबा मिळेल, असे म्हटले आहे.

नितीश कुमार यांची देशाच्या राजकारणासाठी आवश्यकता  –

- Advertisement -

शकील म्हणाले, देशाच्या राजकारणासाठी नितीशकुमार आवश्यक आहेत. ते भाजपच्या विरोधात जोरदार लढा देऊ शकतात. एका प्रश्नावर ते म्हणाले की, सोनिया गांधींसोबत नितीश कुमार यांचे काय झाले ते माहीत नाही. आज काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक आहे, ज्यामध्ये सध्या जी राजकीय परिस्थिती आहे ती कशी पुढे नेली पाहिजे यावर आम्ही सल्लामसलत करणार आहोत, असे ते म्हणाले.

राजदचा पाठिंबा मिळण्याची आशा –

राजदच्या प्रश्नावर, त्यांचा पक्ष कुठे आहे? सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र असतील तर भाजपचा सहज पराभव होऊ शकतो. येत्या निवडणुकीतही आपण एकत्र लढून मोदींना आव्हान देऊ शकतो.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -