घरताज्या घडामोडीभगव्याला हात लावण्याचा जर कुणी प्रयत्न केला, तर..,उद्धव ठाकरेंचा आवाहन

भगव्याला हात लावण्याचा जर कुणी प्रयत्न केला, तर..,उद्धव ठाकरेंचा आवाहन

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. खरी शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणाकडे जाणार?, यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हा वाद सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगासमोर देखील पोहोचला असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य करत आवाहन दिलं आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं. नाशिकमध्ये किमान सदस्यसंख्या एक लाखाच्या वर गेली पाहीजे. कारण माझा तुमच्यावर विश्वास आहे. माझ्याकडे तुमच्याशिवाय दुसरं कुणी नाही. त्यांच्या यंत्रणा काम करत आहेत. आपल्याला मर्दासारखंच जिंकलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

शिवसैनिकाचं रक्त असणारं आपलं मनगट आहे. तुमच्या हातातून भगवा खेचणं दूरच, पण भगव्याला हात लावण्याचा जरी कुणी प्रयत्न केला, तरी त्याला दाखवून द्या, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला केलं आहे.

तुम्हाला सगळ्यांना वेळ आल्यावर चांगली जबाबदारी देणार आहे. पण आत्ता शिवसेनेचा भगवा हातात घट्ट पकडा. मला तुमची अशी-तशी साथ नको आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

- Advertisement -

मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाकडे जाणार, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून निवडणूक आयोगात हे प्रकरण प्रलंबित आहे.


हेही वाचा : पंतप्रधान ओबीसी समाजाचा असूनही 8 वर्षात समाजाला काय मिळाले? काँग्रेसचा गंभीर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -