घरताज्या घडामोडीBIHAR CM माफी: 'मी स्वतःचा निषेध करतो, मला खेद वाटतो'; वादग्रस्त वक्तव्यानंतर...

BIHAR CM माफी: ‘मी स्वतःचा निषेध करतो, मला खेद वाटतो’; वादग्रस्त वक्तव्यानंतर नितीशकुमारांची माफी

Subscribe

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभेत लैंगिक शिक्षणाबद्दल दिलेल्या भाषणावरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाऊ लागले आहे तर विरोधी पक्षाने सभागृहात आणि सभागृहाबाहेरही गदारोळ सुरु केला. यानंतर नितीशकुमार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मी महिलांच्या शिक्षणाबद्दल बोलत होतो. शिक्षणाबद्दल सांगत असताना सहज बोलून गेलो. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो.” असे म्हणत नितीशकुमारांनी सभागृबात माफी मागितली.

बिहारमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी सभागृहात महिला शिक्षणावर नितीशकुमार यांनी मंगळवारी भाषण केले. यावेळी त्यांनी “मुलगी शिकली.. मोठी झाली की तिचे लग्न होते. जेव्हा मुला-मुलीचे लग्न होते. तेव्हा सहाजिकच हे जोडपं मुलांना जन्म देईल.. मात्र मुलगी शिकलेली असेल तर ती पतीला विरोध करु शकते. ज्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात राहू शकते.” अशा अर्थाचे वक्तव्य केले होते.
त्यांच्या या वक्तव्याने राष्ट्रीय राजकारणात गदारोळ उठला आहे. बिहार भाजपने नितीशकुमार यांचा जोरदार विरोध सुरु केला आहे. सोशल मीडियावर देखील त्यांना ट्रोल केले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज सभागृहाचे कामकाज सुरु झाल्याबरोबर नितीशकुमारांनी माफी मागितली आहे.
ते म्हणाले, माझ्या बोलण्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. मी स्वतःचाच निषेध करतो. त्या शब्दांमध्ये मी खेद व्यक्त करतो. माफी मागतो. यावेळी सभागृहात विरोधकांकडून प्रचंड गोंधळ सुरु होता.

- Advertisement -

हेही वाचा : जेवढे जास्त शिक्षण, तेवढी कमी मुलं… नितीशकुमारांच्या दाव्यावर BJP महिला आमदार संतप्त; आकडे काय सांगतात?

विधानसभेत नितीशकुमार काय म्हणाले?
नितीशकुमार म्हणाले, “सर्वांच्या संमतीने काल एक-एक निर्णय घेण्यात आला. आम्ही महिलांच्या शिक्षणावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करत आहोत. जर मुली शिकलेल्या असतील तर प्रजनन दर 2 टक्के राहातो. मुलींच्या शिक्षणात वाढ होत आहे. माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. मी स्वतःचाच निषेध करतो. मला स्वतःबद्दलही वाईट वाटत आहे. त्या सर्व भाषणाबद्दल मी खेद व्यक्त करतो.”

- Advertisement -

नितीशकुमार म्हणाले, “आम्ही एवढे चांगले काम केले आहे. काल सर्वजणांची त्याला संमती होती. आज तुम्हाला सूचना आल्या असतील की निषेध करा. तुम्ही जी भूमिका घ्याल त्याचा मी आदर करतो.”

सभागृहात येण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले, “जर मी काही बोललो असेल आणि ज्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो. माझा निषेध करणाऱ्यांचेही मी अभिनंदन करतो.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -