घरदेश-विदेशनॅशलन हेराल्ड प्रकरण : राहुल, सोनियांना दिलासा नाही

नॅशलन हेराल्ड प्रकरण : राहुल, सोनियांना दिलासा नाही

Subscribe

नॅशलन हेराल्ड प्रकरणामध्ये आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये नॅशलन हेराल्ड प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधातील सुरू असलेला तपास सुरू ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आयकर विभागाला दिले आहेत.

नॅशलन हेराल्ड प्रकरणामध्ये आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये नॅशलन हेराल्ड प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधातील सुरू असलेला तपास सुरू ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आयकर विभागाला दिले आहेत. नॅशनल हेराल्ड हा पेपर सध्या बंद पडला आहे. या बंद पडलेल्या पेपरच्या लखनऊ आणि दिल्ली येथील मालमत्ता कथितरित्या हडपण्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. नॅशनल हेराल्डच्या स्थावर मालमत्तांवर काँग्रेसची नजर होती. या पेपरच्या मालमत्ता हडपण्यासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी यंग इंडिया लिमिटेड कंपनीमार्फत घोटाळा केला असा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी, सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस आणि सॅम पित्रोदा यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप देखील याचिकाकर्ते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडली. यावेळी पुढील सुनावणी होईपर्यंत आयकर विभागानं कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान नॅशनल हेराल्डच्या आडून भाजप सूड उगवत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -