घरCORONA UPDATECorona: दुर्दैवी! बाळाला जन्म दिल्यानंतर पाच दिवसांनी झाला कोरोनामुळे नर्सचा मृत्यू

Corona: दुर्दैवी! बाळाला जन्म दिल्यानंतर पाच दिवसांनी झाला कोरोनामुळे नर्सचा मृत्यू

Subscribe

कोरोनाच्या संसर्गामुळे मायलेकराची कायमची ताटातूट झाल्याची दुर्दैवी घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. एका २८ वर्षीय महिलेने मुलीला जन्म दिल्यानंतर अवघ्या पाच दिवसातच जगाचा निरोप घेतल्याचे समजते.

कोरोनाच्या संसर्गामुळे मायलेकराची कायमची ताटातूट झाल्याची दुर्दैवी घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. एका २८ वर्षीय महिलेने मुलीला जन्म दिल्यानंतर अवघ्या पाच दिवसातच जगाचा निरोप घेतल्याचे समजते. ही महिला कोरोनाबाधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाने त्या नवजात बालकाची आई कायमची हिरावून घेतली असल्याने ही बातमी ऐकणारे हळहळ व्यक्त करत आहेत. मुख्य म्हणजे ही महिला एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती.

काय आहे घटना

मेरी अज्यापोंग ही २८ वर्षीय महिल नर्स म्हणून काम करत होती. मात्र गरोदर असल्यामुळे तिला काही दिवसांपूर्वी सुट्टी देण्यात आली होती. गेल्या आठवड्यात तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर कोरोनाची चाचणी केली असता ही महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली. गरोदर असल्यामुळे मेरीची प्रकृती अधिकच नाजूक झाली होती. डॉक्टरांनी तिची सी-सेक्शनद्वारे प्रसुती केली. परंतू बाळाचा जन्म झाल्यानंतर पाच दिवसांनी मेरीचा मृत्यू झाला. मेरीने मुलीला जन्म दिला असून तिचेही नाव मेरी ठेवण्यात आले आहे. बाळाची प्रकृती स्थिर असली तरी तिचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

मेरीचा हॉस्पिटलमध्ये काम करताना कोरोना रुग्णांशी संपर्क आला नसल्याचे सांगितले जात आहे. तिने कोणत्याही कोरोना रुग्णाला तपासले नव्हते. मात्र ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांना पीपीईशिवाय रुग्णांवर उपचार करावे लागत होते. त्यामुळे मेरीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ब्रिटनमध्ये ९८ हजारहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली असून १२ हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा –

Lockdown : लॉकडाउनचा कालावधी क्रीडा क्षेत्रासाठी अयोग्य काळ!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -