घरदेश-विदेशUGC India hack: विद्यापीठ अनुदान आयोगाचे ट्विटर अकाउंट हॅक; देशभरातील तिसरी घटना

UGC India hack: विद्यापीठ अनुदान आयोगाचे ट्विटर अकाउंट हॅक; देशभरातील तिसरी घटना

Subscribe

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट रविवारी हॅक झाले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या @ugc_india या ट्विटर अकाऊंटचे २ लाख ९६ हजार इतके फॉलोवर्स आहेत. अकाऊंट हॅक झाल्यानंतर प्रोफाईल फोटोही बदलून तो व्यंगचित्राचा ठेवण्यात आला होता.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट रविवारी हॅक झाले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या @ugc_india या ट्विटर अकाऊंटचे २ लाख ९६ हजार इतके फॉलोवर्स आहेत. अकाऊंट हॅक झाल्यानंतर प्रोफाईल फोटोही बदलून तो व्यंगचित्राचा ठेवण्यात आला होता. यूजीसीचे हे ट्विटर अकाउंट पूर्ववत करण्यासाठी कडून प्रयत्न करण्यात येत आहेत. अद्याप हे अकऊंट हॅक होण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

देशातील महत्वाच्या संस्थेचे ट्वीटर सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक होणारी ही तिसरी घटना आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालय आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाचेही गेल्या दोन दिवसांत हॅक झालेले हे तिसरे प्रमुख ट्विटर खातं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ट्विटर अकाऊंचा ताबा काही अज्ञात हॅकर्सनी घेतला होता. यूजीसीच्या ट्विटरचे अकाऊंट हॅक झाल्यानंतर हॅकर्सनी अनेक अनोळखी लोकांना टॅग केल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली.

- Advertisement -

अकाऊंट हॅक झाल्यानंतर प्रोफाईल फोटोही बदलून तो व्यंगचित्राचा ठेवण्यात आला होता. हा फोटो अनेकांना टॅगही करण्यात आला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या अकाऊंटवरुन देशातील जोडल्या गेलेल्या विद्यापीठ, अधिनियम, प्राध्यापक भरती, संशोधन आदी घटनांविषयी माहिती देण्यात येते मात्र रविवारी अकाऊंट हॅक झाल्यानंतर मात्र त्यावरुन व्यंग्यचित्राचे प्रोफाईल फोटो लावून तो अनेकांना टॅग करण्यात आला होता.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या @ugc_india हे युजरनेम असलेल्या ट्विटर हँडलचे जवळपास तीन लाखाच्या आसपास फॉलोअर्स आहेत. तसंच, हे खातं त्याच्या अधिकृत वेबसाइटशी देखील जोडलेलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे ट्विटर हँडलही शनिवारी हॅक झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या हॅकिंगमागे कोणाचा हात आहे हे अजून स्पष्ट झाले नाही.

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर अकाउंट पाठोपाठ हवामान खात्याचे ट्विटर हॅक झाल्याने याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ट्विविटरवरुन नव्या नियमांची माहिती, विद्यापीठांची माहिती, शिक्षण क्षेत्रातील नव्या घडामोडी आणि अधिनियम सांगितले जातात. नेट-सेट, गेट यासारख्या परीक्षांची माहिती, संशोधन आणि इतर माहितीही दिली जाते.


हेही वाचा – शिवसेना भवन मशिद आहे का? मनसेच्या संदीप देशपांडेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -