घरताज्या घडामोडीOmar Abdullah : मनी लॉंड्रिंग प्रकरणात ED कडून ओमर अब्दुल्लाह यांची चौकशी

Omar Abdullah : मनी लॉंड्रिंग प्रकरणात ED कडून ओमर अब्दुल्लाह यांची चौकशी

Subscribe

मनी लॉंड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने गुरूवारी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची चौकशी केली. ईडीने अब्दुल्ला यांना जम्मू काश्मीर (जे एण्ड के) बॅंकेच्या इमारतीच्या खरेदीच्या व्यवहार प्रकरणात काही प्रश्न हे अब्दुल्ला यांना विचारले. ईडीकडून ही चौकशी दिल्ली येथे करण्यात आली.

या व्यवहारात बॅंकेच्या इमारतीची खरेदी ही १२ वर्षे आधी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला हे दिल्लीत केंद्रीय तपास यंत्रणांमार्फतच्या चौकशीसाठी पोहचले. याठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात येत आहे. ईडीकडून या वर्षाच्या सुरूवातीलाच या प्रकरणात तक्रार नोंदवण्यात आली होती.

- Advertisement -

सेंट्रल ब्युरो ऑफ इनवेस्टीगेशन (सीबीआय) ने याआधी जम्मू काश्मीर बॅंकेचे माजी अध्यक्ष मुश्ताक अहमद शेख आणि अन्य व्यक्तींविरोधात कर्ज तसेच गुंतवणूक प्रक्रियेत अनियमितता आढळल्याने गुन्ह्याची नोंद केली होती. ईडीने सीबीआयकडून झालेल्या प्राथमिक कारवाईच्या आधारावरच पीएमएलए कायद्याअंतर्गत तपासाला सुरूवात केली.

सीबीआयने २०२१ मध्ये जम्मू कश्मीर बॅंकेच्या तत्कालीन व्यवस्थापकाविरोधात २०१० मध्ये मुंबईच्या बीकेसीत मेसर्स आकृति गोल्ड बिल्डर्सकडून एक संपत्ती खरेदी केल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. निविदा प्रक्रियेतील अनियमिततेच्या आधारावरच जवळपास १८० कोटी रूपयांच्या अधिक रकमेच्या आधारावरील हा घोटाळा असल्याचे समोर आले होते.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -