घरदेश-विदेशखळबळजनक: पदपथावर राहणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार

खळबळजनक: पदपथावर राहणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार

Subscribe

नवी दिल्लीमध्ये कचरा उचलणाऱ्या व्यक्तीने एका दीड वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

बलात्काराच्या घटानांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशीच एक खळबळजनक घटना नवी दिल्लीमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. पदपथावर राहणाऱ्या दीड वर्षाच्या चिमुरडीवर एका कचरा उचलणाऱ्या नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सीसीटीव्हीच्या मदतीने ४८ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. अनिल (४८) असे या व्यक्तीचे नाव आहे.

नेमके काय घडले?

नवी दिल्लीमध्ये मन हेलावणारी घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीा चिमुरडीचा आई चांदणी चौकातील गुरुद्वारामध्ये भंडाऱ्यात जेवण्यासाठी गेली होती आणि त्या ठिकाणी असलेल्या पदपथावरच झोपली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी आरोपी अनिल हा मद्यप्राशन करुन त्या ठिकाणी आला. त्यांनी नशेत चिमुरडीला उचले आणि तिच्या आईला जाग येण्याआधी त्यांनी त्या चिमुरडीला तिथून अलगद उचलून तिचे अपहरण केले. सकाळी त्या चिमुरडीच्या आईला जाग आली असता तिच्या शेजारी तिची मुलगी नसल्याचे दिसून आले. ते पाहून तिला धक्काच बसला. तिने आजूबाजूला शोधाशोध केली मात्र तिला तिची चिमुरडी आढळली नाही.

- Advertisement -

असा सापडला आरोपी

आरोपी अनिल यांने चिमुरडीला दीड वाजण्याच्या सुमारास उचलून त्या चिमुरडीला रेल्वे स्थानकाच्या पार्सल गोदामात तिला घेऊन गेला. तिथे त्यांने त्या चिमुकलीवर बलात्कार केली. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी चिमुरडीला रक्ताच्या थारोळ्यात सोडल. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुरडीला त्या परिसरातून जाणाऱ्या तृतीयपंथी यांनी पाहिले आणि त्यांनी याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. या घटनेची दखल घेत चिमुरडीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या चिमुरडीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या चिमुरडीचे वडील रिक्षाचालक असून आई कचरा वेचण्याचं काम करते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी अनिल विरोधात पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.


संबंधित बातम्या –

वाचा – खळबळजनक: पोलिस उपनिरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार

- Advertisement -

वाचा – ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -