घरताज्या घडामोडीHathras Rape Case: राहुल गांधींसह फक्त ५ जणांना 'हाथरस'ला जाण्याची परवानगी

Hathras Rape Case: राहुल गांधींसह फक्त ५ जणांना ‘हाथरस’ला जाण्याची परवानगी

Subscribe

हाथरसच्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी आज देखील काँग्रसेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींसह काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी रवाना झाल्या आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि ३५ खासदारांसह शेकडोच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते हाथरसच्या मार्गावर जमले होते. पण आता राहुल गांधी यांच्यासह फक्त ५ जणांना हाथरसला जाण्याची परवानगी उत्तर प्रदेशाच्या सरकारने दिली आहे. यादरम्यान कोरोना संबंधित सर्व मार्गदर्शन सूचनाचे पालन करण्यास सांगितले आहे.

यापूर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी पीडित कुटुंबियांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळेस त्यांना रोखले गेले. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. त्यानंतर आज पुन्हा पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले होते की, ‘या कुटुंबाला भेटून व्यथा मांडण्यासाठी जगातील कोणतीच ताकद रोखू शकत नाही.’

- Advertisement -

हाथरसला जाताना प्रियांका गांधी स्वतः गाडी चालवत होत्या. त्यासोबत राहुल गांधीही होते. त्यांच्या गाडीच्या मागे मोठा ताफा होता. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात फौजफाटा वाढवला होता. युमना एक्स्प्रेस वेवर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्या पाहिला मिळाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी माघारी फिरावं, असं पोलिसांकडून आवाहन करण्यात येत होते. पण काँग्रेस कार्यकर्ते मागे हटले नाहीत त्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा –  राहुल गांधींचा हाथरस दौऱ्यामागे राजकीय हेतू – स्मृती इराणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -