घरदेश-विदेशPakistan Election : होय, मी मतमोजणीत गडबड केली; पाकिस्तानातील निवडणूक अधिकाऱ्याची कबुली

Pakistan Election : होय, मी मतमोजणीत गडबड केली; पाकिस्तानातील निवडणूक अधिकाऱ्याची कबुली

Subscribe

निवडणूक अधिकारी लियाकत अलीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आम्ही 50 हजार मतांच्या फरकाने पराभूत झालेल्यांना विजयी घोषित केले. मी रावळपिंडी विभागातील लोकांवर अन्याय केला असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील रावळपिंडी विभागाचे आयुक्त लियाकत अली चट्टा यांनी आज शनिवारी (17 फेब्रुवारी) निवडणुकीमध्ये झालेल्या गडबडीच्या आरोपामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला. लियाकत अली यांनी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. रावळपिंडीच्या निवडणूक विभागात ‘हेराफेरी’ झाल्याचे त्यांनी मान्य केले आणि त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (Pakistan Election Yes I messed up the counting of votes Confession of Election Officer in Pakistan)

निवडणूक अधिकारी लियाकत अलीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आम्ही 50 हजार मतांच्या फरकाने पराभूत झालेल्यांना विजयी घोषित केले. मी रावळपिंडी विभागातील लोकांवर अन्याय केला असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. मी माझ्या विभागाच्या रिटर्निंग अधिकाऱ्यांची माफी मागतो असेही ते यावेळी म्हणाले. आजही निवडणूक कर्मचारी बॅलेट पेपरवर बनावट शिक्के लावत असल्याचा दावा लियाकत अली यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IND Vs ENG Test : तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे 322 धावांची आघाडी; जैस्वालचे पुन्हा शतक

भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी

रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर पत्रकार परिषदेत बोलताना चट्टा म्हणाले की, आम्ही पराभूत उमेदवारांना विजयी केले आहे. मी रावळपिंडी विभागातील निवडणुकीत हेराफेरीची जबाबदारी स्वीकारत आहे आणि माझ्या पदाचा राजीनामा जाहीर करत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करत आहे. मला कचारी चौक, रावळपिंडी येथे फाशीची शिक्षा द्यावी. पाकिस्तानचा निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त आणि सरन्यायाधीश यांचाही निवडणुकीत हेराफेरी करण्यात हात आहे, माझ्यासह या लोकांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Vijay Wadettiwar : सरकारला प्रायश्चित्त करायला लावले जात असेल तर…; वडेट्टीवारांचे सूचक विधान

विरोधकांनी आरोप फेटाळले

पंजाबचे कार्यवाहक माहिती मंत्री आमिर मीर यांनी लियाकत अलीचे आरोप फेटाळून लावले आणि याला राजकीय स्टंट म्हटले आहे. ते म्हणाले की लियाकत अलीने जी माहिती उघड केली त्यावरुन असे दिसते की त्यांचे मानसिक संतूलन बिघडले किंवा मग राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी ते अशी विधाने करत आहेत, असे मला वाटते. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -