घरदेश-विदेशभारतीय बोटीवर गोळीबार करुन पाकिस्तानने मोडले नियम, भारत नोंदवणार निषेध

भारतीय बोटीवर गोळीबार करुन पाकिस्तानने मोडले नियम, भारत नोंदवणार निषेध

Subscribe

पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीने (PMSA) केलेल्या बेछूट गोळीबारात एक भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे तर दुसरा जखमी झाले आहेत. या घटनेची आता भारताने गंभीर दखल घेतली असून पाकिस्तानला समज देऊन आपला निषेध नोंदवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

जलपरी या मासेमारी नौकेवर असलेल्या महाराष्ट्राच्या ठाण्यातील मच्छीमार पीएमएसएच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. बोटीवर सात जण उपस्थित होते, त्यापैकी एकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. मृत मच्छीमार श्रीधर रमेश चामरे (वय ३२) यांचा मृतदेह रविवारी ओखा बंदरात आणण्यात आला. तर जखमी मच्छिमारावर गुजरातमधील ओखा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी घडली. पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीने कोणतेही कारण नसताना मासेमारीच्या बोटीवर गोळीबार केला.

- Advertisement -

UNCLOS उल्लंघन

मासेमारी नौकांवर गोळीबार करणे हे UNCLOS चे (United Nations Convention on the Law of the Sea)  स्पष्ट उल्लंघन आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या या मुत्सद्देगिरीविरोधात भारत आवाज उठवणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारताने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या या मुत्सद्देगिरीचा मुद्दा योग्य पद्धतीने मांडला जाणार आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून योग्यवेळी पुढील माहिती जाहीर केली जाईल.

- Advertisement -

पाकिस्तानकडून अतिक्रमणाचा आरोप

दरम्यान या बोटीने बेकायदेशीरपणे पाकिस्तानी हद्दीत अतिक्रमण केल्याचा दवा पाकिस्ताकडून करण्यात येत आहे. तसेच पाकिस्तान या कारवाईचे समर्थन करत आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, “पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीच्या जहाजांनी घुसखोरी करणाऱ्या बोटीला रोखण्याचा प्रयत्न केला. वारंवार इशारे देऊनही बोटीने प्रतिसाद दिला नाही. पीएमएसए जहाजाने भारतीय नौकेच्या परिसरात इशाऱ्याला प्रतिसाद दिला नाही. गोळीबार झाला पण तरीही बोटीने आपले इंजिन थांबवले नाही. यानंतर पीएमएसएने थेट भारतीय बोटीवर गोळीबार केला आणि त्यानंतर ती थांबली.”


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -