घरताज्या घडामोडीST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे १६० बस डेपो बंद, प्रवाशांचे हाल

ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे १६० बस डेपो बंद, प्रवाशांचे हाल

Subscribe

राज्यातील एसटी कर्मचारी मागील काही दिवसांपासून संपावर आहेत. राज्य सरकारकडून या कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांच्या १७ संघटनांची या विषयावर बैठक होणार आहे. तर एसटी संपाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयातही सुनावणी होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील एकूण १६० बस डेपो बंद आहेत. तसेच एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. खासगी वाहतूकदारांकडून अवास्तव भाडं आकारण्यात येत असून प्रवाशांची लूट सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र होत जात असल्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

राज्यातील कोल्हापूर, बुलढाणा, खामगाव, पुणे, ठाणे आणि मुंबई तसेच इतर जिल्ह्यांतील काही बस डेपो एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद आहेत. बुलढाण्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोनलही केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातून संघटनांचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

- Advertisement -

स्वारगेट डेपोत घोषणाबाजी

स्वारगेट डेपोमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. आज पुणे जिल्ह्यातील एकूण १३ बस डेपो बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार असून याचा एसटी महामंडळाला देखील फटका बसला आहे. सातवा वेतन लागू करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वारगेट डेपोवर जोरदार घोषणाबाजी केली आहे. जिल्हा अंतर्गत प्रवासी सेवा बंद ठेवण्यात येणरा आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येणार असल्यामुळे काही प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

उच्च न्यायालयात आज सुनावणी

संपाबाबत उच्च न्यायालयात आज सुनावणी घेण्यात येणार आहे. शनिवारच्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांवरुन राज्य सरकारला फटकारले होते. तसेच सुनावणी सोमवारी १० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली होती. आज या संपाच्या विषयावर सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने एसटीचे शासनामध्ये विलनीकरण केले नाही तर एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : “आगीच्या घटनांवर अश्रू ढाळू नका” काय पावलं उचलणार सांगा, राऊतांचा केंद्रासह राज्य सरकारला सवाल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -