घरताज्या घडामोडीपाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर अत्याचार सुरुच; क्लिनिकमध्ये जाऊन केली शीख हकीमची हत्या

पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर अत्याचार सुरुच; क्लिनिकमध्ये जाऊन केली शीख हकीमची हत्या

Subscribe

भारतातील अल्पसंख्यांकांबद्दल खोटी सहानुभूती व्यक्त करणारे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आपल्या देशातील अल्पसंख्यांकांच्या जीवाचे रक्षण करण्यास असमर्थ दिसत आहेत. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आज, गुरुवारी पेशावरमध्ये अज्ञान व्यक्तींनी एका शीख हकीमवर गोळाबार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, हकीम सरदार सतनाम सिंह यांना चार गोळ्या लागल्या आहेत आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तसेच हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. घटनेच्या वेळी हकीम सिंह शहरातील चरसद्दा रोडवर क्लिनिकमध्ये होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हकीम सरदार सतनाम सिंह आपल्या क्लिनिकवर होते तेव्हा हल्लेखोर त्यांच्या केबिनमध्ये घुसले. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. याप्रकरणात पोलीस दहशतवादासह इतर अँगलने तपास करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान पेशावरमध्ये जवळपास १५ हजार शीख लोकं राहतात. यामधील जास्तीत जास्त लोकं व्यवसाय करतात आणि काही जणांचे फार्मेसी आहे. २०१८ साली एक शीख चरजीत सिंह नावाच्या व्यक्तीची पेशावरमध्ये हत्या केली होती. तसेच गेल्या वर्षी पेशावरमध्ये न्यूज अँकर रविद्र सिंह यांची गोळीबार करून हत्या केली. शिवाय यापूर्वी २०१६ साली नेता सोरेन सिंह यांची देखील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

२०१७च्या जनगणनेनुसार अल्पसंख्यांक समुदायात सर्वाधिक लोकसंख्या पाकिस्तानमध्ये हिंदूची आहे. त्यानंतर ईसाई. तसेच पाकिस्तानात शीख, अहमदी आणि पारशी पण अल्पसंख्यांक आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Afghanistan: अजब न्याय! पाव चोरल्याबद्दल दोन मुलांविरोधात तालिबानी खटला दाखल करणार


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -