घरदेश-विदेशParliament : निलंबित खासदाराकडून मिमिक्री, संतापले उपराष्ट्रपती धनखड

Parliament : निलंबित खासदाराकडून मिमिक्री, संतापले उपराष्ट्रपती धनखड

Subscribe

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांत झालेल्या गदारोळामुळे सोमवारी 78 खासदारांना निलंबित करण्यात आले. यातील 33 खासदार लोकसभेतील आणि 45 राज्यसभेतील आहेत. हे निलंबित खासदार मंगळवारी संसदेच्या पायऱ्यांजवळ बसून निदर्शने करत आहेत. त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी हेही समोर उभे होते. यावरून धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – मोठी बातमी : खासदार Supriya Sule यांचे निलंबन; लोकसभेतून आणखी 49 खासदार निलंबित

- Advertisement -

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 13 डिसेंबर रोजी दोघांनी गॅलेरीतून उडी घेत लोकसभेत घुसखोरी केली आणि स्मोक कॅंडल फेकले होते. या घटनेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारी आणि मंगंळवारी देखील वारंवार तहकूब करावे लागले. अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतील 33 खासदारांना, तर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी 45 राज्यसभा खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित सत्रासाठी (22 डिसेंबरपर्यंत) निलंबित केले. अशा प्रकारे दिवसभरात संसदेतील 78 खासदार निलंबित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

तर, आज मंगळवारी देखील संसद घुसखोरी प्रकरणी चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धऱली. या पार्श्वभूमीवर लोकसभेत 49 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. आतापर्यंत दोन्ही सभागृहांतील 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ही दडपशाही नाही तर काय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी निलंबनाच्या कारवाईनंतर सरकारला केला आहे.

हेही वाचा – Parliament : संसद हल्ला आणि खासदार निलंबनाबद्दल शरद पवारांचे उपराष्ट्रपतींना पत्र

या निलंबित खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले आहे. तेव्हा उपराष्ट्रपती धनखड यांची मिमिक्री करण्यात आली. याबाबत नाराजी व्यक्त करताना धनखड यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. तथापि, राहुल गांधी हे याचा व्हिडिओ बनवत असल्याने ते राहुल गांधी यांच्यावर नाराज असल्याचे जाणवते.

नेमके काय घडले?

कल्याण बॅनर्जी यांनी आंदोलनादरम्यान राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या सभागृह चालवण्याच्या पद्धतीची खिल्ली उडवली आणि हे पाहून अनेक विरोधी खासदार हसत होते. काँग्रेस खासदार राहुल गांधीही तिथे उपस्थित होते आणि हसत होते. नंतर त्यांनी खिशातून मोबाइल फोन काढला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्यावरून सत्ताधाऱ्यांची नाराजी वाढली आहे.

हेही वाचा – Parliament : आपण लोकशाहीत असल्याचा आव का आणतो? आदित्य ठाकरेंचा भाजपावर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -