घरदेश-विदेशअदानींच्या मुद्यावर India चे मत काय? उद्धव ठाकरे म्हणाले...

अदानींच्या मुद्यावर India चे मत काय? उद्धव ठाकरे म्हणाले…

Subscribe

मला थंडी वाजते म्हणून मी आज जॅकेट घेतले आहे. पण मी हुडी आणि गॉगल घालून कोणाला भेटण्याची गरज नाही. मी जे करतो, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी इंडियाची आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत इंडियाचे महत्वाचे नेते भेटणार आहे. यावेळी इंडिया  समन्वयक, लोकसभा जागावाटप आणि निवडणुकीसाठीच्या रणनिती आदी मुद्यावर आज बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पत्रकार परिषदेतून दिली आहे. जे जे मुंबई आणि महाराष्ट्र प्रेमी आहेत. ते सर्वजण आंदोलनात सहभागी झाले आणि होती, अशी प्रतिक्रिया इंडिया  अदानीसंदर्भात एकमतावर दिली आहे.

इंडियाचे अदानीच्या मुद्यावर एकतम झाले आहे का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “अदानीच्या आंदोलनाबद्दल इंडियाचा हा विषय नाही. हा विषय माझ्या मुंबई आणि महाराष्ट्राचा विषय आहे. हा आमचा जिवाळ्याचा विषय आहे. जे जे मुंबई आणि महाराष्ट्र प्रेमी आहेत. ते सर्वजण आंदोलनात सहभागी झाले आणि होती.”

- Advertisement -

काँग्रेस आणि आप जुळवून घेत नाही, असा सामनात अग्रलेख आहे, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “कोणाचाही गैरसमज होई नये. सामनाच्या अग्रलेखचा अर्थ असा आहे की, घोडा मैदान आता जवळ आलेले आहे. रणांगणावर प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आलेली आहे, अशा वेळी सर्व एकत्रआले आहे. पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी इंडियाकडे पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी एक समन्वय ज्याला म्हणतो, ज्या समन्वयकाचे नाव जाहीर केल्यानंतर तो पंतप्रधान होईल, असे नाही. एक कोणीतरी निमंत्रक लागले. प्रत्येक जण हे त्यांच्या राज्यात व्यस्त असतात त्यामुळे सर्वांना एकत्रित आणणे. यासाठी एक व्यक्ती लागेल, सर्वजण एकत्र येण्यामागचे कारणच हे आहे की, लोकशाही जगली पाहिजे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. ते नाराज आहेत का?, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “अरविंद केजरीवाल हे अजीबात नाराज नाहीत. इंडियाची आणि माझी बैठक झाली. आजच्या बैठकीच्या देखील आम्ही विषयावर चर्चा केली.”

हेही वाचा – मोठी बातमी : खासदार Supriya Sule यांचे निलंबन; लोकसभेतून आणखी 49 खासदार निलंबित

- Advertisement -

नेतृत्वाबाबत कोणतेही स्वप्न पाहत नाही

सर्व नेत्यांनी तुमच्यानावावर सहमती दर्शवली तर तुम्ही समन्वयकाची जबाबदारीसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले, “मी असे काही बोलत नाही, कारण मी बैठकीत काही तरी सुचवणार आहे. मी हरबऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही. मी मुख्यमंत्री पद देखील जबाबदारी म्हणून स्वीकारले होते. मी कोणतीही अशी वेडी वाकडे स्वप्न नाही. माझ्यासमोर देश आणि महाराष्ट्र आहे. शेवटी देशातील जनता आपल्याकडे आशेने बघते. आम्ही वैयक्तिगत स्वप्न घेऊन उपयोग काय आहे? शेवटी देशातील जनतेला मी हवा की नको. राज्यातील शेतकरी हे त्यांचे अवयव विकायला काढले, अशी परिस्थिती असातना आम्ही मुर्खासारखे भ्रमात राहणार असो तर आम्ही देशाचे राज्यकर्ते म्हणून नालायक ठरू”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – Winter Session : …शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार; विरोधकांचे विधानभवन परिसरात आंदोलन

देशातील लोकशाही जिवंत राहील पाहिजे

लोकसभा निवडणूक ही भारतासाठी महत्वाची पंतप्रधान मोदींसाठी नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, भाजापासाठी मोदी किती महत्वाचे असतील, नसतील हा विषय आमच्याकडे नाही. आमच्या डोळ्यासमोर मोदी नाही भारत आहे. भाजपाने जसे मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहाणांना बदलले तसे ते कदाचित मोदींना बदलू शकतात. तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. आमच्या डोळ्यासमोर आमच्या देशातील लोकशाही जिवंत राहील पाहिजे.

हेही वाचा – Winter Session : विधानसभेत देवयानी फरांदेंचा सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव

भेटीगाठीसाठी मला हुडी, गॉगल घालायची गजर नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज मी भेटी गाठी सुरू करेन आणि संध्याकाळी मी कोणाला भेटलो ते सांगे. मला थंडी वाजते म्हणून मी आज जॅकेट घेतले आहे. पण मी हुडी आणि गॉगल घालून कोणाला भेटण्याची गरज नाही. मी जे करतो, ते उघडपणे करतो”, असा टोला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -