घरदेश-विदेशParliament Security Breach : संसद घुसखोरीचा मास्टरमाइंड मनोरंजन डी! Narco Test मधून माहिती समोर

Parliament Security Breach : संसद घुसखोरीचा मास्टरमाइंड मनोरंजन डी! Narco Test मधून माहिती समोर

Subscribe

2001 मध्ये संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याच्या तब्बल 22 नंतर संसदेमध्ये घुसखोरी करण्यात आली आहे. सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम आजाद, ललित झा आणि महेश कुमावत या जणांना शनिवारी (13 जानेवारी) पटीयाला उच्च न्यायालयात हजर करण्यात आले होते.

नवी दिल्ली : संसदेवरील हल्ल्याच्या तब्बल 22 नंतर पुन्हा 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेमध्ये घुसखोरी करण्यात आली होती. या घुसखोरीमागे कोण मास्टरमाईंड कोण? हा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याची माहिती समोर आली आहे. संसद घुसखोरी मागे ललित झा नसून, मनोरंजन डी असल्याची माहिती नार्को टेस्टमून पुढे आली आहे. (Parliament Security Breach The Mastermind of Parliament Intrusion Entertainment D Information from Narco Test in front)

2001 मध्ये संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याच्या तब्बल 22 नंतर संसदेमध्ये घुसखोरी करण्यात आली आहे. सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम आजाद, ललित झा आणि महेश कुमावत या जणांना शनिवारी (13 जानेवारी) पटीयाला उच्च न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नीलम वगळता इतर 5 आरोपींना पॉलीग्राफी टेस्टसाठी गुजरातमध्ये नेण्यात आले होते. सागर आणि मनोरंजन डी.चीही नॅरो आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात आली होती. नीलमने या टेस्टसाठी सहमती दर्शवली नाही. त्यामुळे तिला या टेस्टसाठी नेण्यात आलेले नव्हते. उर्वरित आरोपींच्या मात्र, टेस्ट करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Gold Silver Rate : सोन्या-चांदीचे भाव पोहोचणार 70 हजारांवर, जाणून घ्या आजचे दर

संसदेमध्ये घुसखोरी का केली? यामागे कोणती कारणे होती? याचीही माहिती समोर आली आहे. आतापर्यंतच्या तपासात आणि चौकशीत आरोपींनी सरकारला संदेश देण्याची योजना आखली होती. बेरोजगारी, मणिपूरचे संकट आणि शेतकरी आंदोलनामुळे ते त्रस्त होते. या सगळ्याचा परिपाक संसदेमध्ये घुसखोरीमध्ये झाला. 13 डिसेंबर रोजी, संसदेवर 2001 च्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणीत सगळेजण बुडलेले असताना सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली. तसेच, दोघांनीही घोषणाबाजी करताना स्मोक कॅंडल फोडून संसदेत धूळ पसरवला.

- Advertisement -

हेही वाचा : खोके घेऊन आमदार फुटावेत तसा ‘लवाद’ फुटला आणि… Sanjay Raut यांचा नार्वेकरांवर निशाणा

अशी केली जाते नार्को टेस्ट

नार्को चाचणी अंतर्गत, रक्तवाहिनीमध्ये औषध टाकले जाते जे व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत घेऊन जाते. या काळात व्यक्ती अशा अवस्थेत पोहोचते ज्यामध्ये त्याच्याकडील माहिती पुढे येण्याची शक्यता असते. जी सामान्यतः जाणीव अवस्थेत प्रकट केली जाऊ शकत नाही. ब्रेन मॅपिंग ज्याला न्यूरो मॅपिंग तंत्र असेही म्हणतात, गुन्ह्याशी संबंधित चित्रे किंवा शब्दांवर मेंदूच्या प्रतिक्रियांचे विश्लेषण करते. पॉलीग्राफ चाचणीमध्ये श्वासोच्छवासाची गती, रक्तदाब, घाम येणे आणि हृदय गती यांचे विश्लेषण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना ती व्यक्ती खोटे बोलत आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -