घरमहाराष्ट्रखोके घेऊन आमदार फुटावेत तसा ‘लवाद’ फुटला आणि... Sanjay Raut यांचा नार्वेकरांवर...

खोके घेऊन आमदार फुटावेत तसा ‘लवाद’ फुटला आणि… Sanjay Raut यांचा नार्वेकरांवर निशाणा

Subscribe

मुंबई : शिंदे गट भाजपाच्या मदतीने सत्तेवर आला. शिवसेनेत फूट पाडून हे सर्व करणे म्हणजे घटनेच्या 10व्या शेड्युलनुसार पक्षांतर बंदी कायद्याचे सरळसरळ उल्लंघन ठरते आणि त्याबद्दल पहिल्या 16 आमदारांना अपात्र ठरवून कायद्याची बूज राखणे, हे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लवादाचे काम होते. लवादाने निकाल देण्यासाठी दीड वर्ष लावले आणि निकाल दिला तो असा की, देशाचे संविधान, न्यायदेवतेलाच धक्का बसला. खोके घेऊन आमदार फुटावेत तसा ‘लवाद’ फुटला आणि भ्रष्टाचाराला-पक्षांतराला मान्यता देऊन घोटाळा केला, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – “हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढा…”, Sanjay Raut यांचे CM Eknath Shinde यांना आव्हान

- Advertisement -

ज्या राज्यात न्या. रामशास्त्री प्रभुणे व घटनाकार डा. बाबासाहेब आंबेडकर जन्मले, निर्माण झाले त्या राज्यात सत्य आणि न्यायाचा मुडदा न्यायासनावर बसलेल्या विद्वान व्यक्तीने पाडला. “न्यायदेवते, तू रडू नकोस! तुझ्या उद्धाराचा काळ समीप आला आहे,” असे उद्गार आधुनिक मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक अच्युतराव कोल्हटकर आज जिवंत असते तर त्यांनी काढले असते, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या रोखठोक सदरात म्हटले आहे.

हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट व खालच्या कोर्टातच नाही, तर न्याय देण्याची जबाबदारी ज्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीवर आहे त्यांचेही कसे अध:पतन झाले आहे, ते महाराष्ट्रातील शिवसेना फुटीच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष म्हणजे न्याय लवादाने दाखवून दिले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना फुटीच्या प्रकरणात ‘लवाद’ म्हणून कर्तव्य पार पाडावे, असे निर्देश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले. पण ‘लवाद’ नेमका विरुद्ध वागला, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Milind Deora यांच्या राजीनाम्यावर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया, म्हणाले – “काँग्रेसने…”

उद्धव ठाकरे गटाकडून सादर केलेल्या कागदपत्रांत त्रुटी आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीच्या नोंदीच नाहीत, असे सांगून शिंदे गटास मान्यता देणे हा लोकशाही, नीतिमूल्यांचा खून आहे. ‘लवाद’ म्हणून एका महान संस्थेच्या सिंहासनावर बसलेल्या व्यक्तीकडून इतके मोठे पाप घडावे, हे महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेचे दुर्दैव आहे, अशी टिप्पणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

न्यायदेवतेलाच आंधळी ठेवण्यामागे अशी दुष्टबुद्धी असेल असे कधी वाटले नव्हते. ‘नोंदी’ आणि ‘कागदपत्रे’ हाच मुद्दा असेल तर जो पक्ष कधीच अस्तित्वात नव्हता, अशा शिंदे गटाच्या कोणत्या नोंदीमुळे ‘लवाद’ खूश झाला आणि त्यांना मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली? शिवसेनेतील फुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय खंडपीठाने काही निरीक्षणे नोंदवली. त्या सर्व निरीक्षणांना आणि सूचनांना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर नामक लवादाने केराची टोपली दाखवली, अशी जोरदार टीका त्यानी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -