घरदेश-विदेशरेल्वे किचनवर आता प्रवाशी ठेवू शकणार लक्ष

रेल्वे किचनवर आता प्रवाशी ठेवू शकणार लक्ष

Subscribe

रेल्वेत विकल्या जाणाऱ्या जेवनाला दर्जा नसतो अशा प्रकारची तक्रार करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने एका नवीन उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रवाशांना आता रेल्वेच्या किचनवर प्रवाशी लक्ष ठेवू शकणार आहेत.

भारतीय रेल्वेमधून प्रत्येक दिवशी लाखोंच्या संख्येने प्रवाशी प्रवास करतात. रेल्वेकडून विकण्यात येणाऱ्या अन्नाच्या दर्जावर नेहेमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. रेल्वेच्या जेवण बनवण्याच्या पद्धतींचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. लोकांमध्ये रे्लवेच्या सेवेबाबत शंका निर्माण होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक नवीन ऑनलाइन सेवा सुरु केली आहे. रेल्वेमंंत्री पियुष गोयल यांनी या सेवेची सुरुवात केली आहे. या सेवेअंतर्गत रेल्वे किचनची अवस्था प्रवाशी थेट बघू शकणार आहेत. यासाठी प्रावाशांना रेल्वेच्या संकेत स्थळावर जावे लागणार आहे. किचनवर लक्ष ठेवण्याऐवजी प्रवाशांना त्यांच्या तक्रारी, तिकीट संबधी प्रश्नही विचारता येणार आहेत.

काय म्हणाले गोयल

या सेवेसाठी प्रवाशांना www.raildrishti.cris.org.in या वेबसाइटवर जावे लागणार आहे. या सेवेच्या उदघाटना वेळी पियुष गोयल यांनी म्हटले की,”लोकांना रेल्वे पासून असलेल्या अपेक्षांना पूर्ण करण्याचे काम आम्ही करत आहोत. या सेवेच्या आधारे आम्ही डिजीटल रेल्वेचे स्वप्न पूर्ण करत आहोत. या वेबसाइटवर प्रवाशांना रेल्वे संबधी पूर्ण माहिती मिळेल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -