घरताज्या घडामोडीबापरे! चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढ

बापरे! चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढ

Subscribe

रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये ६० टक्के रुग्ण हे व्हायरल आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांनी ग्रस्त आहेत.

डास चावल्याने होणाऱ्या चिकनगुनिया (chikungunya ) आणि डेंग्यूसारख्या (dengue )आजारामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Patients with chikungunya and dengue increased by 10% over the previous year)  डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, खासगी रुग्णालयात एका दिवसात कमीत कमी ३०-४० ओपीडी या चिकनगुनिया आणि डेंग्यू सारख्या आजारांसाठी सुरू आहेत. मागील वर्षी खासगी रुग्णालयात ही संख्या खासगी रुग्णालयात ४-५ टक्के होती. रुग्णालयात दररोज चिकनगुनीया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत.

लहान मुले ते वृद्धांपर्यंत सर्वांना चिकनगुनिया आणि डेंग्यू सारखे आजार होत आहेत. अनेकांना ताप आणि कमजोरी सारखी लक्षणे दिसत आहेत. प्रत्येक ओपीडीमध्ये एका दिवसात २५-४० रुग्ण समोर येत आहेत. यात काही गंभीर रुग्णांना आयसीयूमध्ये देखील ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये ६० टक्के रुग्ण हे व्हायरल आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांनी ग्रस्त आहेत. कमी रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या व्यक्तींना याचा मोठा धोका संभवतो आहे. डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेटची संख्या कमी होते. त्याचप्रमाणे ताप,उल्टी आणि कमजोरी दिसून येत आहे.

चिकनगुनिया, डेंग्यू सारख्या आजारांपासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्याल?

  • मच्छर घरात येऊ नयेत यासाठी दरवाजे खिडक्यांना पडदे लावा.
  • घरात एसी असेल तर ती नियमितपणे स्वच्छ करा.
  • घराच्या आजूबाजूला पाणी साचले असेल तर ते वेळवर रिकामी करा. आठवड्यातून एकदा पाण्याचे ड्रम,बादली स्वच्छ करा.
  • पाण्याची भांडी योग्यरित्या छाकून ठेवा जेणेकरुन पाणी उघडे राहून त्यात मच्छर अंडी घालणार नाहीत.

हेही वाचा – MPमध्ये ९०० हून अधिक डेंग्यूचे रुग्ण, याचा कोरोनाशी काही संबंध आहे का?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -