घरदेश-विदेशCorona Vaccine: डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी ठरणार Nasal Vaccine? वाचा सविस्तर

Corona Vaccine: डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी ठरणार Nasal Vaccine? वाचा सविस्तर

Subscribe

गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोनाचा कहर सुरू असून अद्याप तो सुरूच आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रापुढे प्रत्येक दिवशी नवं आव्हान उभं ठाकताना दिसतंय. या कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अधिक कार्यक्षम लस शोधणे हे मोठं आव्हान आहे. सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या लस नवीन व्हेरिएंटवर कमी प्रभावी असल्याचे मानले जाते आहे. त्यामुळे लसींची निर्मिती करणाऱ्याला प्रभावी लस शोधण्यास भाग पाडले जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान सर्व लसीच्या चाचण्यांमध्ये हैदराबाद स्थित असणाऱ्या भारत बायोटेकने विकसित केलेली नेजल व्हॅक्सिन गेम-चेंजर असल्याचे मानले जात आहे. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनही कोरोना लस देखील बनवली असताना नेजल व्हॅक्सिनच्या नुकताच दुसरा आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांसाठी मंजूर झाली आहे. नेजल व्हॅक्सिन व्हायरसविरूद्ध शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत कऱण्यास आणि ती वाढवण्यात मदत करत असल्याचे सांगितले जात आहे.

डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी ठरणार ?

डेल्टा व्हेरिएंट हा व्हायरसच्या मूळ स्ट्रेनपेक्षा अधिक संक्रामक म्हणून ओळखला जातो, ज्यामुळे त्याचे गंभीर लक्षणे देखील असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत, सध्याची लस अशा व्हेरिएंटविरुद्ध कमी प्रभावी मानली जाते. त्यामुळे काही फार्मास्युटिकल कंपन्या अशा काही प्रभावी बूस्टर शॉट्स घेऊन येत आहेत जे डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध अधिक चांगले कार्य करू शकते. यासह दुसरीकडे, असे मानले जाते की, नेजल व्हॅक्सिन व्हेरिएंटविरूद्ध चांगले कार्य करते. कारण नेजल व्हॅक्सिनद्वारे अधिक संरक्षण मिळते. ज्याद्वारे प्रतिकारशक्ती विकसित होते आणि जी इंट्रामस्क्युलर डोसच्या बाबतीत पाळली जात नाही. याव्यतिरिक्त, नेजल व्हॅक्सिन अधिक प्रभावी असल्याचे म्हटले जात आहे. कारण ही लस थेट श्वसनमार्गाद्वारे शरीरात पोहोचवण्यास मदत करते.

- Advertisement -

भारतात कधी येणार नेजल व्हॅक्सिन?

कोरोना महामारीसह श्वसन रोगांसाठी नेजल व्हॅक्सिन खूप फायदेशीर ठरत असल्याचे मानले जात आहे. मात्र, नेजल व्हॅक्सिनला सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. सध्या, जगभरात काही कंपन्या नेजल व्हॅक्सिनवर काम करत आहेत. काही कंपन्यांच्या चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत, तर काही अद्याप चाचणीसाठी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. भारतात, भारत बायोटेक नेजल व्हॅक्सिनच्या चाचणीवर काम करत असून ही फार्मास्युटिकल कंपनी गेल्या वर्षापासून या लसीवर काम करत आहे. माहितीनुसार, पहिला टप्पा यशस्वी झाल्याने या कंपनीला चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी परवानगी मिळाली आहे.


Kabul Airport Attack: काबूल विमानतळाजवळ आज पुन्हा एअरस्ट्राइक

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -