घरदेश-विदेशपवारांना काँग्रेसचे अध्यक्ष  करावे

पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष  करावे

Subscribe

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सल्ला

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास आम्हालाच फायद्याचे आहे. त्यांच्यामुळे आम्हाला चांगली संधी असते. सध्या काँग्रेसला अध्यक्षच सापडत नाही. त्यामुळे शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. यासोबतच पवार जर एनडीएमध्ये आल्यास मोदींचे हात आणखी बळकट होईल, असेही ते म्हणाले.

करोना काळात मृत्यू झालेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी आणि एका पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान, आठवले म्हणाले की, सध्या काँग्रेसला अध्यक्षच सापडत नाही. त्यामुळे शरद पवारांना (युपीएऐवजी) काँग्रेसचे अध्यक्ष करावे. पवार यांना काँग्रेस पक्षाने अपमानास्पद वागणूक दिली. त्यांना पंतप्रधान होण्याची संधी असतानाही डावलले. संसदीय बोर्डाच्या बैठकीतही त्यांच्याशी योग्य पध्दतीने वागत नव्हते. दस्तुरखुद्द सोनीया गांधी यांनीही त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. पवार यांच्यावर काँग्रेसमध्ये असताना अन्याय झाला. आता हा अन्याय दूर करण्याची संधी काँग्रेसजवळ आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष केल्यास काय हरकत आहे, असेही आठवले म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार जर एनडीएमध्ये आल्यास मोदींचे हात आणखी बळकट होतील, असेही आठवले म्हणाले. अंबानी व अदानी आधीच श्रीमंत आहेत. त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. त्यांच्या फायद्यासाठी हे कृषी कायदे तयार करण्यात आले असतील, हा आरोपही आठवले यांनी फेटाळून लावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -