घरमहाराष्ट्रमुंबईकर बेफिकीर! विनामास्क फिरणार्‍यांच्या संख्येत वाढ

मुंबईकर बेफिकीर! विनामास्क फिरणार्‍यांच्या संख्येत वाढ

Subscribe

कोरोना काळातही मुंबईकरांची बेफिकीर वृत्ती समोर, महिनाभरात विनामास्क फिरणार्‍यांची संख्या दुप्पट

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत विनामास्क फिरणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या महिन्याभरात विनामास्क फिरणार्‍यांची संख्या दुप्पट झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे कोरोना काळातही मुंबईकरांची बेफिकीर वृत्ती समोर येत आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात मुंबईत विनामास्क फिरणार्‍या 3 लाख 59 हजार 384 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात त्यांच्याकडून 7 कोटी 28 लाख 63 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई महापालिकेने आतापर्यंत राबवलेल्या मोहिमेत एकूण 12 कोटी 95 लाख 57 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याशिवाय पालिकेने 10 नोव्हेंबरपर्यंत 2 लाख 70 हजार 232 मास्क न घालणार्‍यांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 5 कोटी 66 लाख 93 हजार 600 कोटींचा दंड वसूल केला आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी बेफिकीरपणे वागणार्‍या मुंबईकरांमुळे गेल्या एका महिन्यात या दंडाच्या रकमेत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर वावरताना मास्कचा वापर करा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवरही कारवाई सुरू केली आहे. यात आतापर्यंत 6 हजार 587 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 12 लाख 87 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईत सद्यस्थितीत 12 हजार 464 सक्रिय रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासात 680 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण  कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 90 हजार 023 इतकी झाली आहे. दोन आठवड्यांनी २०२० हे वर्ष संपेल. या वर्षाच्या सुरुवातीला नागरिकांना खूप अपेक्षा होत्या; पण या वर्षात आपल्याला जागतिक महामारीला सामोरं जावं लागेल, अशी वर्षाच्या सुरुवातीला कुणीही कल्पना केली नसेल. कोरोनावर अद्याप कोणतेही कायमस्वरुपी औषध आलेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -