घरदेश-विदेशअटलबिहारी वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी रीघ

अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी रीघ

Subscribe

भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी अनेक राजकीय नेते आणि त्यांच्या अनुयायांनी हजेरी लावली अाहे. दिल्लीत मोठा जनसागर उसळला असून त्यामुळे वाहतुकीतही बदल करण्यात आले आहे.

भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं दिर्घ आजाराने गुरूवारी (१६ ऑगस्ट) निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालेल्या अटलजींचे अनुयायी आणि शिष्य अवघ्या भारतात आहेत. या सर्वच अनुयायांनी आता दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी आणि निवासस्थानाच्या बाहेर गर्दी केली आहे. अटलजींचे पार्थिव त्यांच्या दिल्लीतील 6-A कृष्ण मेनन मार्गावरील घरी ठेवले असून तिथे राजकीय नेते आणि त्यांच्या अनुयायांनी दर्शन घेण्यासाठी रीघ लावली आहे.

वाहतूक मार्गांमध्ये बदल

दिल्ली येथील कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यामुळे वाहतुकीतही बदल करण्यात आले असून काही वेळेसाठी नवी दिल्लीतील २५ मार्ग बंद करण्यात आले आहेत. ९ ते ११ पर्यत हे २५ मार्ग बंद करण्यात आले आहेत. काही वेळेसाठी ट्रॅफिकही डायव्हर्ट करण्यात आले असल्याची माहिती दिल्लीचे डीसीपी मयुर वर्मा यांनी माय महानगरशी बोलताना दिली आहे.

- Advertisement -

राजकीय नेत्यांनी वाहीली अटलजींना श्रद्धांजली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले अटलजींचे अंत्यदर्शन


काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनीही घेतले अंत्यदर्शन

- Advertisement -


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही घेतले अंतिम दर्शन


भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली पुष्पचक्राची श्रद्धांजली


शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही वाहिली श्रद्धांजली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -