घरदेश-विदेशसलग ११ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

सलग ११ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

Subscribe

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असूनही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. गेल्या ११ दिवसांत पेट्रोल ६.०० रुपये प्रति लीटर महाग झालं आहे, तर डिझेलच्या दरातही ६.४० रुपयांनी वाढ झाली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज बुधवारी पुन्हा इंधनाचे दर वाढवले. मुंबईत आज पेट्रोल ५३ पैशांनी महाग झालं आहे तर डिझेल १.३२ पैशांनी महाग झालं आहे. आज मुंबईतील पेट्रोलचे दर ८४.१५ तर डिझेलची किमत ७४.३२ रुपये झाली आहे. सलग ११ दिवस पेट्रोल-डिझेल महाग झालं आहे. दिल्लीत पेट्रोल ७७.२८ रुपये तर डिझेल ७५.७९ रुपये झालं आहे.

- Advertisement -

११ दिवसांत डिझेल ६.४० रुपयांनी महाग

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या ११ दिवसांपासून कमी झाल्या असल्या तरी भारतात त्याचे दर सातत्याने वाढत आहेत. सध्या भारतीय बास्केट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरलच्या आसपास सुमारे ३५ डॉलरवर आली आहे. पण त्या अनुषंगाने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले नाहीत.


हेही वाचा – भारत-चीन तणाव: संयुक्त राष्ट्रसंघाकडून संयम पाळण्याचे आवाहन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -