घरदेश-विदेशविमान हायजॅक अफवा प्रकरण; मुंबईच्या सोने व्यापाऱ्याला जन्मठेप

विमान हायजॅक अफवा प्रकरण; मुंबईच्या सोने व्यापाऱ्याला जन्मठेप

Subscribe

दोन वर्षांपूर्वी जेट एअरलाईन्सचे विमान हायजॅक करण्यात आल्याची अफवा पसरवणाऱ्या मुंबईतील व्यापारी बिरजू सल्ला याला सर्वोच न्यायालयाने दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी जेट एअरलाईन्सचे विमान हायजॅक करण्यात आल्याची अफवा पसरवणाऱ्या मुंबईतील व्यापारी बिरजू सल्ला याला सर्वोच न्यायालयाने दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचसोबतच त्याला ५ कोटी रुपयांच्या दंड देखील ठोठावण्यात आला आहे. बिरजू सल्ला हि पहिलीच अशी व्यक्ति आहे की, ज्याला या गुन्ह्यात जन्मठेपेची आणि द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम त्यावेळी विमानात असणाऱ्या पायलटला आणि प्रवाशांना देण्यात यावा, असा निर्णय न्यायालायने दिला आहे.

नेमके काय घडले?

बिर्जू किशोर सल्ला असं त्याचं नाव असून तो सोन्याचा व्यापारी आहे. ३० ऑक्टोबर २०१७ मध्ये जेट विमानाच्या बिझनेस क्लासच्या शौचालयात त्याने एक चिठ्ठी ठेवली होती. ‘हे विमान १२ जणांनी हायजॅक केलं असून दिल्लीला उतरवल्यावर लोकांचे खून होतील’, असे त्या चिठ्ठीत लिहिण्यात आले होते. तसेच, विमानात बॉम्ब असल्याचा दावाही करण्यात आला होता. या चिठ्ठीमुळे विमान दिल्लीऐवजी अहमदाबादला वळवण्यात आले. मात्र, तपासणी झाल्यावर विमानात कुणीही दहशतवादी किंवा बॉम्ब नसल्याचं स्पष्ट झालं.

- Advertisement -

हेही वाचा – भारताला विमान अपहरण करण्याची धमकी


विमानाच्या शौचालयात सापडली चिट्ठी

या प्रकरणात अहमदाबाद पोलीस तपास करीत असताना ज्या विमानाच्या शौचालयात चिट्ठी सापडली त्या विमानाच्या शौचालयता अनेक वेळा ये जा करणारा प्रवासी मुंबईतील सोने व्यापारी बिरजू सल्ला हा असल्याचे स्पष्ट होताच अहमदाबाद पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली होती. या गुन्हाच तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. बिरजू हा व्यवसायानिमित्त नेहमी मुंबई ते दिल्ली विमान प्रवास करीत होता. या दरम्यान, त्याचे विमानातील एका हवाई सुंदरी सोबत मैत्री झाली होती, मात्र तीने नोकरी सोडून आपल्यासोबत रहावे, असे त्याला वाटत होते. प्रथम तिने नोकरी सोडणार असल्याचे सांगून नंतर तिने आपले नोकरी न सोडण्याचा निर्णय घेतला होता. जेट एअरलाईन्समध्ये तिची प्रतिमा खराब केल्यावर तिला नोकरीवरुन कमी केले जाईल, त्यानंतर ती माझ्या सोबत राहील, असे त्याला वाटले आणि त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना त्यावेळी दिली होती.

- Advertisement -

या खटल्याचे कामकाज सर्वोच्च न्यायालयात सुरु होते. सर्वोच्च न्यायालयाने बिरजू सल्ला याला दोषी ठरवून मंगळवारी त्याला या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच ५ कोटी रुपयांच्या दंड देखील ठोठवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी या अफवेमुळे वैमानिक आणि प्रवाश्याना त्रास झाला त्यांना हि रक्कम देण्यात यावी असा निर्णय देखील न्यायालयाने दिला आहे.


हेही वाचा – बांगलादेशातील विमान हायजॅकचा डाव फसला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -