घरमुंबईमुख्यालय नाल्यावरील कारवाईत अभियंत्यांना धक्काबुक्की, मारहाण

मुख्यालय नाल्यावरील कारवाईत अभियंत्यांना धक्काबुक्की, मारहाण

Subscribe

धारावीतील मुख्याध्यापक नाल्याच्या रुंदीकरण आणि खोलीकरणास अडथळा ठरणारी ३४ अतिक्रमणे हटवण्याच्या कामाला मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत २० अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली असून उर्वरित बांधकामे उद्या हटवण्यात येणार आहेत.

माटुंगा पूर्व आणि धारावी परिसरात पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरणार्‍या मुख्यालय नाल्याच्या रुंदीकरणात बाधित होणार्‍या अतिक्रमणांवर मंगळवारी महापालिकेच्या जी-उत्तर विभागाच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई सुरु असताना रहिवाशांनी महापालिकेच्या अभियंत्यांसह कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्यामुळे त्यांना शीवच्या महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे एका बाजूला बेहरामपाड्यासारख्या संवेदनशील भागात शांततेत कारवाई सुरु असताना दुसरीकडे धारावीत रहिवाशी आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत.

कारवाईदरम्यान झाली मारहाण

धारावीतील मुख्याध्यापक नाल्याच्या रुंदीकरण आणि खोलीकरणास अडथळा ठरणारी ३४ अतिक्रमणे हटवण्याच्या कामाला मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत २० अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली असून उर्वरित बांधकामे उद्या हटवण्यात येणार आहेत. दिवसभर पोलीस संरक्षणात सुरु असलेल्या या धडक कारवाईदरम्यान घटनास्थळी कर्तव्यावर असलेले दुय्यम अभियंता अमित पाटील यांना मारहाण झाली. तर अभियंता रोहित आफळे आणि कामगार निलेश पाटील यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेनंतर अमित पाटील यांना शीव परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर याबाबत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया धारावी पोलीस ठाणे येथे सुरु असल्याची माहिती ’जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. या कारवाई दरम्यान तोडण्यात येणाऱ्या ३४ अनधिकृत बांधकामांपैकी १२ बांधकामे पात्र असून त्यांना माहुल परिसरात पर्यायी सदनिका देण्यात आल्या असल्याची माहिती दिघावकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या परिमंडळ – २ चे उपायुक्त नरेंद्र बरडे यांच्या मार्गदर्शनानुसार ’जी उत्तर’ विभागाद्वारे मुख्याध्यापक नाल्याच्या लगत उद्भवलेल्या अतिक्रमणांवर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये महापालिकेचे ९० कामगार – कर्मचारी – अधिकारी सहभागी झाले होते. तसेच या कारवाईसाठी मुंबई पोलीस दलाचे ८० पोलीस कर्मचारी – अधिकारी यांचा ताफाही घटनास्थळी तैनात होता. या कारवाई दरम्यान ३ जेसीबी, ४ डंपर यासह इतर आवश्यक वाहने आणि साधनसामुग्री वापरण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -