घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांसमोर बोलले पण....

पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांसमोर बोलले पण….

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ५ राज्यांच्या विधानसभा निकालावर बोलणं मात्र टाळलं.

५ राज्यांच्या निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसारमाध्यमांसमोर आले. पण, त्यांनी पाच राज्यांच्या निकालावर बोलणं मात्र टाळलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाद – विवाद व्हावेत. पण, सर्व पक्षांनी देशाच्या हिताचा विचार करावा असं मत मांडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच राज्यांच्या निकालावर बोलतील अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना, छत्तीसगड आणि मिझोरामच्या विधानसभा निकालामध्ये भाजपला अपेक्षित यश मिळताना पाहायाला मिळत नाही. मध्यप्रदेशमध्ये देखील सत्ताधारी भाजपला काँग्रेसनं धोबी पछाड देत बहुमताकडं वाटचाल केल्याचं सध्या तरी दिसत आहे. आज संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून यावेळी आजच्या निकालामुळे विरोधकांना बळ मिळाल्याचं पाहायाला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -