घरदेश-विदेशपंतप्रधानांनीसुद्धा केली 'या' विरोधी पक्षनेत्याची स्तुती

पंतप्रधानांनीसुद्धा केली ‘या’ विरोधी पक्षनेत्याची स्तुती

Subscribe

कॉंग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्तुती केली आहे.

१७व्या लोकसभेच्या प्रथम सत्राला सोमवारी सुरूवात होण्याआधी रविवारी आयोजित बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार अधीर चौधरींची ‘लढवय्या’ बोलून स्तुती केली होती. स्वतः अधीर चौधरी यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले.

अधीर चौधरींनी सांगितले की, मी पंतप्रधानांना नमस्कार केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी पाठ थोपटताना तू लढवय्या आहेस असे बोलून सर्वांसमोर माझे कौतुक केले. पंतप्रधानांच्या कौतुकाने मला खूप आनंद झाला. त्यापुढे अधीर चौधरी म्हणाले की, आम्ही सगळे जनतेचे प्रतिनिधी आहोत. ते (भाजपवाले) सुद्धा आहेत. माझे कोणाशीही शत्रूत्व नाही. आम्ही आमचा आवाज उठवणार आणि ते त्यांचा. आम्ही बोलण्यासाठी संसदेत जाणार आहोत. रणांगणात नाही.

- Advertisement -

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे कट्टर टीकाकार

लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीर चौधरी हे प. बंगालमधील राजकारणी आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे टीकाकार म्हणून अधीर चौंधरींना ओळखले जाते. १९९९ पासून बहरामपूर येथून अधीर चौधरी कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -