घरताज्या घडामोडीPM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात दहावा हप्ता जमा करण्याबाबत पीएम मोदींकडून मोठी...

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात दहावा हप्ता जमा करण्याबाबत पीएम मोदींकडून मोठी घोषणा

Subscribe

१.२४ लाखाहून जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार...

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पीएम मोदींनी किसान योजनेचा आज(शनिवार) १० वा हप्ता खात्यावर जमा करणार (DBT) आहेत. ही प्रक्रिया सुरू असतानाच नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.

शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी निरंतर कटीबद्धता आणि निर्धार जारी राखत पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता १ जानेवारी २०२२ रोजी (PM Kisan 10th Installment 2022) दूरदृश्य प्रणालीद्वारे जारी करणार आहेत. यावेळी १० कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना २०,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित होणार आहे.

- Advertisement -

पीएम-किसान योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाला, चार महिन्यांच्या अंतराने २००० रुपयांचे तीन हप्ते असे वार्षिक ६००० रुपये देण्यात येतात. लाभार्थींच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होते. या योजनेत १.६ लाख कोटीपेक्षा जास्त सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबाना आतापर्यंत हस्तांतरित करण्यात आली आहे.

१.२४ लाखाहून जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार

या कार्यक्रमात सुमारे ३५१ शेतकरी उत्पादन संस्थाना १४ कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधान जारी करणार असून १.२४ लाखाहून जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथील शेतकरी उत्पादक कंपनीशी पीएम मोदी यांनी जीवामृत संदर्भात संवाद साधला. उत्तराखंडच्या शेतकऱ्यांनंतर नरेंद्र मोदींनी पंजाब जागृती किसान उत्पादक संघटनेच्या रवींद्र सिंग यांच्याशी संवाद साधला. रवींद्र सिंग यांनी २८५ शेतकरी सदस्य असल्याचं सांगितलं आहे.

- Advertisement -

या शेतकऱ्यांना मिळणार ४ हजार रूपये

ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या ९ व्या हप्ताचा लाभ झालेला नाहीये. त्यांच्या खात्यात सुद्धा ९वा आणि १० वा हप्ता जारी केला जाणार आहे. तसेच त्यांच्या खात्यात ४००० रूपये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. मात्र, एक महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबर २०२० रोजी नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांनाच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -