घरताज्या घडामोडीवाढत्या महागाईविरोधात पंतप्रधान मोदींच्या भावाचे दिल्लीत धरणे आंदोलन, काय आहेत मागण्या?

वाढत्या महागाईविरोधात पंतप्रधान मोदींच्या भावाचे दिल्लीत धरणे आंदोलन, काय आहेत मागण्या?

Subscribe

वाढत्या महागाईविरोधात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी विविध मागण्यांसाठी दिल्लीत धरणं आंदोलन केलं. आंदोलनावेळी आपल्या मागण्या सांगत असताना प्रल्हाद मोदी यांनी असा प्रश्न विचारला की, माझा भाऊ पंतप्रधान आहे, म्हणून काय झाले?, मी उपाशी मरू का/?, असा सवाल प्रल्हाद मोदी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी रेशन डीलर्स असोसिएशनसोबत केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शन केलं. प्रल्हाद मोदी हे रेशन डीलर असोसिएशचे अध्यक्ष आहेत.

प्रल्हाद मोदी हे ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डिलर्स फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डिलर्स फेडरेशनचे सदस्यसुद्धा यावेळी होते. प्रल्हाद मोदी यांच्यासह आंदोलकांनी हातात बॅनर घेऊन घोषणाबाजी केली. प्रल्हाद मोदी म्हणाले की, ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करणार आहे. आमच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांची यादी या निवेदनातून दिली जाईल.

- Advertisement -

वाढत्या महागाईमुळे दुकाने चालवण्यासाठी जास्त खर्च करावा लागत आहे. आमच्या मार्जिनमध्ये फक्त २० पैसे प्रति किलो वाढ करणं, ही क्रूर चेष्टा आहे. आम्‍हाला दिलासा द्यावा, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करतो, असं प्रल्हाद मोदी म्हणाले.

केंद्र सरकारने तांदूळ, गहू आणि साखरेची नुकसानभरपाई द्यावी. खाद्यतेल आणि डाळींचं वाटप रास्त भाव दुकानांमधून करावं, यासह विविध मागण्या त्यांच्या फेडरशेनने केल्या आहेत. ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डिलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंबर बसू म्हणाले की, आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेण्याचा विचार करत आहोत. तसेच खाद्यतेल आणि दाळीसाठीही नुकसान भरपाईची मागणी करत आहोत, असं विश्वंबर बसू म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : LIVE UPDATE : हिंगोली शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांना पोलीस कोठडी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -