घरदेश-विदेशट्विटरच्या नव्या मोहीमेचा राजकीय नेत्यांसोबत सेलिब्रिटींना फटका

ट्विटरच्या नव्या मोहीमेचा राजकीय नेत्यांसोबत सेलिब्रिटींना फटका

Subscribe

ट्विटरने सध्या चालू नसलेली आणि लॉक झालेली अकाऊंट बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेमुळे अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी यांचे फॉलोअर्सच्या संख्येमध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली आहे.

ट्विटरने हाती घेतलेल्या नव्या मोहीमेमुळे प्रसिध्द व्यक्तींच्या फॉलोअर्समध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. ट्विटरने चालू नसलेली आणि लॉक झालेली अनेक अकाऊंट बंद केली. याच्यामुळे अनेक प्रसिध्द व्यक्तींच्या फॉलोअर्समध्ये लाखोंच्या संख्येने घट झाली आहे. ट्विटरने यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती.

काय आहे ट्विटरची मोहीम

ट्विटरने सध्या चालू नसलेली आणि लॉक झालेली अकाऊंट बंद करण्याची मोहीम हाती घेतली. या मोहीमेचा थेट परिणाम अनेक सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सवर झाला आहे. ट्विटरने ही मोहीम राबवत असताना अवघ्या काही मिनिटातच सर्वांचे फॉलोअर्स कमी झाले आहेत. ट्विटरच्या या मोहीमेमुळे पतंप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांच्या फॉलोअर्समध्ये घट झाली आहे. तर दुसरीकडे सेलिब्रिटी अमिताभ बच्चन, सलमान खान, शहारुख खान, दीपिका पदुकोन, प्रियंका चोप्रा यांच्या फॉलोअर्समध्ये देखील घट झाली आहे. त्याचसोबत क्रिडाविश्वातील अनेक प्रसिध्द क्रिकेटर यांच्या फॉलोअर्समध्ये सुध्दा घट झाली आहे.

- Advertisement -

राजकिय नेत्यांचे फॉलोअर्स घटले

ट्विटरच्या मोहिमेमुळे राजकीय नेत्यांच्या फॉलोअर्समध्ये देखील घट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २,८४,७४६, परराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराजचे ७४,१३२, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचे १७,१३२, अमित शहा याचे ३३,३६६, अरविंद केजरीवाल यांचे ९१,५५५ फॉलोअर्स कमी झाले आहेत.

सेलिब्रिटींचे फॉलोअर्स घटले

ट्विटरच्या या मोहीमेनंतर अवघ्या काही मिनिटातच अभिनेता अमिताब बच्चन यांचे ४,२४,०००, शाहरुख खानचे ३,६२,१४१, सलमान खानचे ३,४०,८८४ फॉलोअर्स कमी झाले आहेत. तर अभिनेत्री प्रियंका चोप्राचे ३,५४,८३० आणि दीपिका पदुकोनचे २,८८,२९८ फॉलोअर्स कमी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -