घरदेश-विदेशThackeray group : विश्वगुरू 'या'प्रकरणी गप्प आहेत, ठाकरे गटाकडून मोदींवर शरसंधान

Thackeray group : विश्वगुरू ‘या’प्रकरणी गप्प आहेत, ठाकरे गटाकडून मोदींवर शरसंधान

Subscribe

मुंबई : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कठोर टीकाकार आणि राजकीय विरोधक अॅलेक्सी नवलनी (वय 47) यांचा तुरुंगातच मृत्यू झाला आहे. नवलनी यांच्या मृत्यूमागे रहस्य आणि कारस्थान आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतीन यांनीच नवलनींची हत्या केल्याचे सांगितले. पुतीन यांना कोणाच्या जगण्या-मरण्याने काहीही फरक पडत नाही, असे झेलेन्स्की यांनी सांगितले; पण स्वतःस लोकशाहीवादी वगैरे मानणाऱ्या हिंदुस्थानकडून ‘पुतीन आणि नवलनी’ प्रकरणावर काहीच भाष्य केले गेलेले नाही. विश्वगुरू याप्रकरणी गप्प आहेत, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – Shiv Jayanti 2024 : राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह, शिवनेरीवर पोलीस बंदोबस्त

- Advertisement -

नवलनी यांचा नैसर्गिक मृत्यू नसून रशियाच्या परंपरेनुसार नवलनी यांची हत्याच झाली आहे, यावर जगाचे एकमत आहे. नवलनी यांच्या मृत्यूमुळे ‘लोकशाही’ मानणाऱ्या देशांनी चिंता व्यक्त केली. त्यात अमेरिका, जर्मनी, ब्रिटन यांच्यासह ‘नाटो’ राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली. अमेरिकेने तर या मृत्यूस पुतीन यांनाच जबाबदार ठरवले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

रशियाचे विरोधी पक्षनेते नवलनी यांनी पुतीनविरोधात रान उठवले आणि भ्रष्टाचार, ऐयाशीचा पर्दाफाश केला. रशियात लोकशाही टिकावी आणि संसदेची प्रतिष्ठा राहावी, यासाठी त्यांचा एकाकी संघर्ष सुरू होता. नवलनींच्या संशयास्पद मृत्यूने पुतीन यांच्या कारभारावर संशय निर्माण झाला. याआधी नवलनींना विषप्रयोगाने मारण्याचा प्रयत्न झाला. त्यातून ते वाचले. तेव्हा दहशतवादी कृत्यास पाठिंबा देण्याच्या आरोपावरून पुतीन यांनी त्यांना अटक केली आणि 30 वर्षांची सजा ठोठावली, असेही या अग्रलेखात नमूद केले आहे.

- Advertisement -

सन 2017मध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यात त्यांनी एक डोळा गमावला. 2018 साली त्यांनी पुतीन यांच्याविरोधात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – NCP : महेश जाधव राष्ट्रवादीत; ‘नमक हराम’ चित्रपटाचा दाखला देत अजित पवारांची मनसेवर टीका

नवलनी यांना पुतीन यांनी यामालो-नेनेट्स तुरुंगात कोंडले आणि तो तुरुंग भयंकर म्हणून ओळखला जातो. मॉस्कोपासून अडीच हजार किलोमीटर दूर अशा निर्जन डोंगराळ भागात हा तुरुंग आहे. एखादा कैदी या तुरुंगात गेल्यावर त्याची कोणतीच खबर बाहेरच्या दुनियेस कळत नाही. त्यामुळे नवलनी हे तुरुंगात गेले आणि आता फक्त त्यांच्या मृत्यूची खबरच बाहेर पडली. अॅलेक्सी यांच्या मृत्यूने पुतीन यांना रशियात कोणीच विरोधक उरलेला नाही. जो पुतीन यांच्या विरोधात आवाज उठवेल, तो एक तर गायब होईल किंवा अॅलेक्सीप्रमाणे संशयास्पदरीत्या मृत होईल, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : अल्पसंख्याक समाजातील मुलींना मोफत उच्च शिक्षण; अजित पवारांची ग्वाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -