घरताज्या घडामोडीयाचं काहीतरी भलतच! चड्डी छोटी शिवली म्हणून थेट गेला कोर्टात

याचं काहीतरी भलतच! चड्डी छोटी शिवली म्हणून थेट गेला कोर्टात

Subscribe

शिंप्याने चड्डी छोटी शिवली म्हणून एका व्यक्तीने थेट पोलिसात तक्रार केल्याची घटना घडली आहे. केवळ इतकच नाही तर या कराणामुळे त्याने थेट न्यायालय गाठले आणि अजब सल्ला त्याला चक्क पोलिसांनीच दिला होता. ही घटना घडलीये भोपाळमध्ये.

कृष्ण कुमार दुबे हा ४६ वर्षीय व्यक्ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पण त्याची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. दुबे नोकरीसाठी भोपाळमध्ये आला होता. शहरात येण्यापूर्वी त्याने मित्राकडून एक हजार रूपये घेतले होते आणि गरजोपयोगी वस्तू घेतल्या. शहरात एका शिंपीकडे जाऊन त्याने एका चड्डी शिवायला दिली.

- Advertisement -

पण शिंपीने जी चड्डी शिवली ती एकदी छोटी झाली. म्हणून दुबे शिंपीकडे गेला आणि जाब विचारला. तेव्हा शिंपी म्हणाला की तुम्ही फक्त दोन मीटर कापड दिले होते. म्हणून तेवढीच शिवली. यावर दुबेचे समाधान झाले नाही म्हणून दुबेने थेट पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी दुबेला कोर्टात केस कर असा सल्ला दिला. अखेर शिप्पींने पैसे देतो म्हटल्यावर हे प्रकरण मिटले.


हे ही वाचा – ऑफिसमध्ये रोमान्स, २७ टक्के कर्मचाऱ्यांना बॉसबरोबरच जायचय डेटवर!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -