घरताज्या घडामोडीलाल किल्ला हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या ८३ आरोपींना पंजाब सरकारचे बक्षीस जाहीर

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या ८३ आरोपींना पंजाब सरकारचे बक्षीस जाहीर

Subscribe

पंजाब सरकारने शेतकरी आंदोलनच्या समर्थनार्थात एक मोठी घोषणा केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, ‘यावर्षी २६ जानेवारीला झालेल्या घटनेप्रकरणात दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या पंजाबच्या ८३ लोकांना २ लाखांची आर्थिक मदत दिली जाईल.’ चरणजीत सिंह चन्नी यांनी ट्वीटवर याबाबची माहिती दिली. निवडणुकांच्या तोंडावर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या मनधरणीसाठी खटाटोप सुरू असल्याचे बोलले जात आहे.

चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, ‘काळे कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला माझ्या सरकारचे पूर्ण समर्थन आहे. २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीमुळे दिल्ली पोलिसांकडून ८३ जणांचा अटक केली होती, त्यांना आम्ही प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

- Advertisement -

२६ जानेवारी २०२१ला तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने ट्रॅक्टर रॅली काढली होती. यादरम्यान ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण आले होते. तेव्हा आंदोलनकर्त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि लाल किल्ला परिसरात घुसून एक धर्मिक ध्वज फडकवला होता. लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांचा एक समूह आणि दिल्ली पोलिसांमध्ये चकमक झाली होती. त्यानंतर २०० हून अधिक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान तीन कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने ५०० शेतकरी २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात दररोज ट्रॅक्टरने संसदेकडे नेण्यात येणाऱ्या मोर्चात भाग घेतील. संयुक्त किसान मोर्चाने मंगळवारी सांगितले की, ‘पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश शेतकरी गेल्या २६ नोव्हेंबरपासून कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ते दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत.’ दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे कायदे लागू न करण्यावर जानेवारीमध्ये रोख लावली होती. अलीकडेच चाळीस शेतकरी संघांच्या संघटनाने ट्रॅक्टर मार्चची घोषणा केली होती. २६ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने या आंदोलनाला देशभर व्यापक धार देण्यात येणार आहे.


हेही वाचा – 2 Day Lockdown : तर दोन दिवसांचा लॉकडाऊन का करत नाही ? सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -