घरताज्या घडामोडीamravati violence: देशात धार्मिक विद्वेष पसरावा ही भाजपाची इच्छा, सचिन सावंत यांचा...

amravati violence: देशात धार्मिक विद्वेष पसरावा ही भाजपाची इच्छा, सचिन सावंत यांचा भाजपवर घणाघात

Subscribe

राज्यातील महाविकास सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपचा हा कुटील डाव असल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. अमरावतीमध्ये घडलेल्या दंगलीवरुन सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देशात धार्मिक विद्वेष पसरवा ही भाजपची इच्छा असल्याचे सावंत म्हणाले. त्रिपुरामध्ये घडललेल्या घटनेवरुन महाराष्ट्रात दंगल हिंसा घडली आहे. भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली होती परंतु या बंदचे हिंसेत रुपांतर झाले. काही दुकानांची तोडफोड करण्यात आली असून जमावाकडून दगडफेकही झाली आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत अमरावतीमध्ये घडलेल्या घटनेवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. देशात धार्मिक विद्वेष पसरावा ही भाजपची इच्छा आहे हे लक्षात ठेवा असे सावंत म्हणाले. तसेच महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी अनेक कुटील डाव मायावी भाजपाने केले. आता राज्यात दंगास्त्र वापरत आहेत. भीमा कोरेगाव येथे हेच केलं गेलं असे सचिन सावंत यांनी सांगितलं आहे. पण अगोदर प्रमाणेच हे ही अस्त्र जनताच निष्प्रभ करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन आणि हिंसा करण्यात येत आहे. जमावाकडून दुकानांवर दगडफेक करण्यात आली. अमरावतीमध्ये दंगल उफाळली असल्यामुळे संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावरील मेसेज आणि फोटोमुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी इंटरनेटसेवा देखील बंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

दंगली पेटवून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपचा प्रयत्न

त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेवरुन महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजपचे षडयंत्र आहे. असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. भाजपच्या या षडयंत्राला बळी पडू नका आणि अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखा असे आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे. देशात आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण पेटवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.


हेही वाचा :  Amravati violence : अमरावती शहरात संचारबंदी लागू, इंटरनेट ठप्प


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -