घरमहाराष्ट्रपुणेCM Eknath Shinde : वारसा सांगण्याआधी आरसा पाहा; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

CM Eknath Shinde : वारसा सांगण्याआधी आरसा पाहा; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे जसे दिसतात तसे नाहीत. ते म्हणतात ना एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग त्या प्रमाणे एका चेहऱ्यामागं अनेक मुखवटे घालून ते फिरतात. ते दिसतात तसे इनोसंट नाहीत, त्यामागे अनेक चेहरे आहेत.

कोल्हापूर : शिवसेना शिंदे गटाचे अधिवेशन कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आले असून, आज 17 फेब्रुवारी रोजी या अधिवेशनाच्या समारोपीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जे आज वारसा सांगतात त्यांनी आधी आरसा बघावा अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाकडून कसे उत्तर मिळते हे पहावे लागणार आहे. (CM Eknath Shinde Look in the mirror before telling the legacy Chief Minister Shinde attacked Thackeray)

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे जसे दिसतात तसे नाहीत. ते म्हणतात ना एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग त्या प्रमाणे एका चेहऱ्यामागं अनेक मुखवटे घालून ते फिरतात. ते दिसतात तसे इनोसंट नाहीत, त्यामागे अनेक चेहरे आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना तांत्रिक अडचणीमुळे माइकचा आवाज गेला. काही वेळानंतर ही तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा एकदा बोलण्यास सुरुवात करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माझा आवाज असा बंद करु नका, तसा तो बंद होणार नाही. कारण माझ्या सोबत शिवसैनिक आहेत.

- Advertisement -

पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्ला करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलं आहे. हे मी संसदीय शब्द बोलतोय, मी कधीही असंसंदीय शब्द बोलत नाही हे तुम्हाला निलम गोऱ्हे सांगतील. मविआसोबत दिल्लीला गेले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला. तेव्हा एकटेच गेले. केबिनमध्ये आणि बाहेर आल्यावर घाम फुटला होता. दोन ग्लास पाणी प्यायले होते हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितले, असा किस्सा सांगितला.

हेही वाचा : Eknath Shinde : “एक दिवस तुम्ही कचऱ्यात जाणार…” शिंदेंचा ठाकरेंवर घणाघाती हल्ला

- Advertisement -

ज्या शिवसेना भाजप युतीसोबत लढलात. त्यांच्यासोबत सरकार स्थापन करायला हवं होत. पण तसं न करता जनतेला फसवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फसवलं. सत्तेच्या खूर्चीसाठी सगळ्यांना फसवलं. मोदींना भेटून कमेंटमेंट केली की, चला आता युती करुया आणि पुन्हा एकदा पलटी मारली आणि तुम्ही आम्हाला काय गद्दार. आम्ही गद्दारी नाही केली, आम्ही शिवसेना वाढविण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी वेगळे झालो आहोत. तर जे वारसा सांगतात त्यांनी स्वतःची प्रतिमा आरश्यात पहावी. ज्यांनी शिवसेना वाढविण्यासाठी अतोनात मेहनत घेतली त्यांना डावलं आणि आयत्या पीठावर रेगोट्या मारायला आले. परंतु त्याही रेगोट्या मारता आल्या नाही.

हेही वाचा : Pankaja Munde : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला ईपीएफओ नोटीस; वाचा सविस्तर

आपल्याच पक्षातील नेत्यांना म्हणजे मनोहर जोशींना भर व्यासपीठावरुन खाली उतरवायला लावले. एवढंच काय मी रामदास कदम यांना सांगितलं की, षण्मुखानंद सभागृहात येऊ नका, तुमचा मनोहर पंत करतील. गजानन कीर्तिकरांना वारंवार परत पाठवलं. नारायण राणे, राज ठाकरेंनी काय मागितलं होतं तुम्हाला? जे नेते शिवसेना सोडून गेले त्यांना रोखलं का नाही? आपल्याच पक्षातील नेत्यांना एकमेकांविरुद्ध झुंजावणारा नेता मी कधीच पाहिला नाही. दोन चार टकल्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा होत नाही. असाही टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -