घरताज्या घडामोडीमहागाई, शेतकरी, पेगॅसस विषयांवर चर्चा करा, संसदेचा वेळ वाया घालवू नका, राहुल...

महागाई, शेतकरी, पेगॅसस विषयांवर चर्चा करा, संसदेचा वेळ वाया घालवू नका, राहुल गांधींची टीका

Subscribe

खासदारांनी जनतेचा आवाज बनून राष्ट्रीय महत्त्वांच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगॅसस, महागाई, कृषी कायदे या विषयांवर केंद्र सरकारने चर्चा करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. परंतू केंद्र सरकार विरोधकांची मागणी वारंवार फेटाळत असल्यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महागाई, शेतकरी पेगॅसस विषयांवर चर्चा करा आणि संसदेचा वेळ वाया घालवू नका असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला आहे. केंद्र सरकारने पेगॅसस खरेदी केलं का नाही याचे उत्तर जनतेला जाणून घ्यायचे असल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे.

काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पेगॅसस प्रकरणावरुन हल्लाबोल सुरुच ठेवला आहे. विरोधकांना कोरोना, महागाई, तीन कृषी कायदे, पेगॅसस प्रकरणावर चर्चा हवी आहे. परंतू केंद्र सरकार या विषयांवरुन पळ काढत आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्रावर निशाणा साधला आहे. आपल्या लोकशाहीचा पाया असा आहे की, खासदारांनी जनतेचा आवाज बनून राष्ट्रीय महत्त्वांच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. परंतू मोदी सरकार विरोधी पक्षनेत्यांने हा काम करु देत नाही आहे. संसदेचा वेळ वाया घालवू नका, विरोधकांना महागाई, शेतकरी विषयांवर आणि पेगॅससच्या मुद्द्यावर चर्चा करु द्या अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

- Advertisement -

पेगॅसस प्रकरणावरुन संसदेत हल्लाबोल

पेगॅसस प्रकरणातील काही अहवाल समोर आल्यानंतर केंद्र सरकारने पेगॅसस सॉफ्टवेयर खरेदी केलं असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच या सॉफ्टवेयरचा उपयोग केंद्र सरकारनं स्वतःच्याच मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या विरोधात हे हत्यार वापरलं आहे. पेगॅसस प्रकरणावरुन विरोधकांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच याच विषयांवर चर्चा करण्यात यावी अशी मागणीही सर्व विरोधी पक्षातील खासदारांनी केली आहे. मात्र केंद्र सरकार या विषयावर चर्च करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. दोन आठवड्यांच्या काळात संसदेत केवळ ४ ते ५ तासांचे कामकाज झालं आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज वारंवार तहकूब करण्यात येत आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -