घरदेश-विदेशRahul Gandhi : लोकसभेत मोदींनी सलग दोन तास चेष्टा केली; मणिपूरप्रकरणी राहुल...

Rahul Gandhi : लोकसभेत मोदींनी सलग दोन तास चेष्टा केली; मणिपूरप्रकरणी राहुल गांधींची टीका

Subscribe

Rahul Gandhi : मणिपूर हिंसाचारावरून (Manipur Violence) लोकसभेत मोदी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्ताव गुरुवारी (10 ऑगस्ट) फेटाळण्यात आला आहे. मणिपूरप्रकरणी पंतप्रधानांनी बोलावं, अशी विरोधकांची मागणी होती आणि यासाठीच त्यांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. दरम्यान, मोदींनी सभागृहात भाषण करताना विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. याच भाषणावर आता विरोधकांकडूनही टीका करण्यास सुरूवात झाली आहे. आज काँग्रेसकडून (Congress) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, मोदींनी लोकसभेत केलेल्या 2 तास 13 मिनिटांच्या भाषणात मणिपूरबाबत फक्त चेष्टा केली. (Rahul Gandhi Modi made fun of him for two consecutive hours in the Lok Sabha Rahul Gandhis criticism on the Manipur issue)

हेही वाचा – विरोधी पक्षांच्या ‘INDIA’ नावाला आव्हान; मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी नकार

- Advertisement -

पंतप्रधान संसदेत हसत होते

लोकसभेत केलेल्या भाषणाप्रकरणी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, मणिपूरमध्ये जे काही घडत आहे, ती भारताची हत्या आहे, असे मी विधान केले होते. परंतु त्यावर पंतप्रधान हसले. ते मणिपूरला जाऊ शकत नाहीत. पण भारताचे सैन्य मणिपूरला जाऊ शकतात. त्यांना मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार तीन दिवसांत थांबवा, असे तर, ते दोन दिवसांत थांबवू शकतात. पण पंतप्रधानांना मणिपूर जाळायचे आहे आणि त्यांना आग विझवायची नाही. पंतप्रधान मणिपूरला जाऊ शकले असते, समुदायांशी बोलू शकले असते. मी तुमचा पंतप्रधान आहे, चला बोलूया. पण तसे काहीच झाले नाही. प्रश्न हा नाही की, मोदी 2024 मध्ये पंतप्रधान होतील की नाही, प्रश्न हा आहे की, मणिपूरमध्ये लहान मुलं, लोक मारले जात आहेत.

- Advertisement -

हिंसाचारानंतर मणिपूर दोन भागात विभागले गेले

मणिपूरप्रकरणी केलेल्या वक्यव्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी मणिपूरला पोहोचल्यावर मैतेई भागात गेलो. तेव्हा आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आले की, तुमच्या सुरक्षा तुकडीत काही कुकी असल्यास त्यांना आणू नका, आम्ही त्यांना मारून टाकू. जेव्हा आम्ही कुकी भागात गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की, मैतेई लोकांना आणू नका, आम्ही त्यांना गोळ्या घालू. आम्ही जिथे गेलो तिथे आमच्या सुरक्षेतून मैतेई आणि कुकी समाजाच्या लोकांना बाजूला करण्यात आले. म्हणजेच त्या राज्याचे दोन भाग झाले आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा – अमित शहांवर कारवाई करा, कलावती बांदुरकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

सरकारने मणिपूरमध्ये भारताची हत्या केली

राहुल गांधी म्हणाले की, मी जवळपास 19 वर्षांपासून राजकारणात आहे. मी जवळपास प्रत्येक राज्यात फिरलो आहे. पूर, त्सुनामी किंवा हिंसाचार पाहिला आहे, पण माझ्या 19 वर्षांच्या अनुभवात मी मणिपूरमध्ये जे पाहिले आहे, ते यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. म्हणून मी संसदेत म्हणालो अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -