घरदेश-विदेश'चूल्‍हा मिट्टी का, मिट्टी तालाब की, तालाब ‘हमारे दो’ का'! कवितेतून राहुल...

‘चूल्‍हा मिट्टी का, मिट्टी तालाब की, तालाब ‘हमारे दो’ का’! कवितेतून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

Subscribe

तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर -मंतरवर आंदोलक प्रतिकात्मक ‘किसान संसद’ भरवत आहेत. दरम्यान, आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष, नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांचे नेते शेतकऱ्यांसोबत एकता दाखवण्यासाठी जंतर -मंतरवर दाखल झाले होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर प्रत्येक कामाचे श्रेय घेतल्याबद्दल जोरदार टीका केली आहे. इतकेच नाही तर कवितेच्या माध्यमातून त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आज एक ट्विट केल, यामध्ये त्यांनी असे म्हटले की, चुल मातीची असू शकते आणि माती तलावाची असू शकते, पण त्या तलावावर फक्त दोन लोकांचा अधिकार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मोदी सरकारने पाठ फिरवली आणि केवळ दोन लोकांसाठी काम केल्याचा आरोपही त्यांनी केल्याचे या ट्विटमध्ये दिसते.

- Advertisement -

असं आहे राहुल गांधीचं ट्विट

यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवर फोटोसह कविता शेअर केली. कवितेच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आणि ते शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगितले. “चूल्‍हा मिट्टी का..मिट्टी तालाब की.. तालाब ‘हमारे दो’ का… बैल ‘हमारे दो’ का,, हल ‘हमारे दो’ का,, हल की मूठ पर हथेली किसान की,,फ़सल ‘हमारे दो’ की.. कुआँ ‘हमारे दो’ का,, पानी ‘हमारे दो’ का,, खेत-खलिहान ‘हमारे दो’ के ,, PM ‘हमारे दो’ के…मग शेतकऱ्याचे काय? शेतकऱ्यासाठी आपणच आहोत! ”

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ १४ विरोधी पक्षांचे नेते आज जंतर -मंतरवर पोहोचले होते. राहुल गांधी यांचाही यात सहभाग होता. राहुल म्हणाले की, सर्व खासदार शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी तिथे पोहोचले आहेत. ते म्हणाले की, केंद्र सरकारला कोणत्याही परिस्थितीत हा कृषी कायदा रद्द करावा लागेल.शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी संसदेत पोहोचलेल्या नेत्यांमध्ये राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, शिवसेनेचे संजय राऊत, राजदचे मनोज झा, सीपीआयचे विनय विश्वम, समाजवादी पक्षाचे एसटी हसन आणि इतर विरोधी नेते उपस्थित होते.


नाव बदलण्याची कृती भाजपच्या द्वेषमुलक वृत्तीतूनच आले, नाना पटोलेंचा मोदींवर घणाघात

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -