घरमनोरंजन...आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सोनू सूद पुढे सरसावला

…आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सोनू सूद पुढे सरसावला

Subscribe

राज्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने अक्षरश: लोकांची झोप उडाली. अनेक जिल्ह्यांमध्ये महापूराने मोठी आर्थिक आणि जीवितहानी झाली आहे. या पावसामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले तर अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना सावरण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र बॉलिवूडमधील एकाही कलाकाराने मदत तर सोडा पण यावर बोलणंही टाळले. त्यामुळे मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी गरीबांचा ‘मसिहा’ आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सूदवर जोरदार टीका केली.

या टीकेनंतर अखेर अभिनेता सोनू सूद महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. पुरामुळे अडचणीत सापडलेल्या परंतु आत्तापर्यंत कोणताही मदत न मिळू शकलेल्या गावांपर्यंत सोनू सूद मदत कार्य पोहचवणार आहे. यासाठी सोनू सूदने चिपळूण, महाड आणि अन्य अनेक भागांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पॅकेज पाठवले आहे.

- Advertisement -

याविषयी सोनू सूदने सांगितले की, महापुरामुळे अधिक प्रभावी झालेली गावं, जी मुख्य महामार्गापासून २० ते ३० किलोमीटर दूर आहेत आणि जिथे अद्याप कोणतेही मदत साहित्य पोहचेले नाही. अशा गावांमधील सरपंच्यांशी चर्चा केली आहे. या गावांमध्ये आता ब्लॅकेटस, भांडी, चटई, कपडे आणि खाण्या-पिण्याचे असे अत्यावश्यक साहित्य पाठवले जाणार आहेत. या गावांतील पुरग्रस्त कुटुंबांना मदत पोहवण्यासाठी त्याची टीम प्रत्यक्ष  तेथे उपस्थित राहील. काही ट्र्क भरून सामान उद्या पोहचेल तर काही एक दिवसानंतर पोहचेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

- Advertisement -

महामार्गापासून जवळपास असणाऱ्या पुरग्रस्त गावांमध्ये मदत साहित्य वेगाने पोहचत आहे. मात्र महामार्गापासून अधिक दूर असणाऱ्या पुरग्रस्त गावांमध्ये मदत साहित्य पोहण्यासाठी अडचणी येत आहेत. सोनू सूदची टीम अशा अधिक दूर असणाऱ्या पूरग्रस्त गावांमध्ये पोहचण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे क्षेत्रपाल, रुद्राणी, दोंडाशीसह अनेक गावांपर्यंत मदत साहित्य पोहचेल. या भागांतील जवळपास १००० हून अधिक कुटुंबांना हे मदत साहित्य दिले जाणार आहे. तर ४ दिवसांतच दुसरा ट्रक इतर गावांमध्ये पोहचेल.

महापूराच्या घटनेनंतर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातून सर्वतोपरी मदत सुरु आहे. मात्र बॉलिवूड कलाकार मात्र मदतीसाठी पुढे आल्याचे चित्र फारसे दिसले नाही. यावरून मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी बॉलीवूड कलाकारांवर जोरदार टीका केली. यासंबंधीत एक ट्वीट त्यांनी केलं होत. खासकरून या ट्वीटमध्ये परराज्यातील लोकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारा अभिनेता सोनू सूदच्या नावाचा उल्लेख केला होता.

यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान ‘मसीहा’चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..? असा सवाल विचारण्यात आला. या ट्वीटमध्ये कोकणातील पूर परिस्थितीचे दोन भीषण फोटो शेअर करत त्यांनी ते ट्वीट सोनू सूदला देखील टॅग केलं होतं.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे कोरोनाच्या भीषण संकटात सोनू सूदने अडचणीस सापडलेल्य़ा नागरिकांची सर्वतोपरी मदत केली. त्यामुळे जगभरात त्याला मसिहा असे नाव देण्यात आले, पण पुरग्रस्तांमा कुठलीही मदत केल्याचे समोर आले नाही. त्यांमुळे शालिनी ठाकरे यांनी सोनू सूदवर टीका केली होती.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -