घरदेश-विदेशसरकारच्या दबावामुळे कंपनी माझे फॉलोवर्स कमी करतेय; राहुल गांधींचे twitter च्या सीईओंना...

सरकारच्या दबावामुळे कंपनी माझे फॉलोवर्स कमी करतेय; राहुल गांधींचे twitter च्या सीईओंना पत्र

Subscribe

राहुल गांधी यांनीही ट्विटरच्या सीईओंना पत्र लिहून एक अहवाल पाठवला आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा डेटा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या खात्यांच्या डेटाचे विश्लेषण केले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी 27 डिसेंबर 2021 रोजी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारच्या दबावाखाली ट्विटर काम करत असून त्यांच्या ट्विटर फॉलोवर्सची संख्या सातत्याने कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुमारे 7 महिन्यांपूर्वी त्यांच्या फॉलोवर्सची संख्या 4 लाखांनी वाढली होती, पण ऑगस्ट 2021 नंतर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या कमी होऊ लागली आहे.

राहुल गांधींच्या आरोपांवर आता ट्विटरनेही प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरच्या वतीने असे म्हटले आहे की, ‘आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारी हजारो अकाऊंट आम्ही दर आठवड्याला काढून टाकतो. या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही Twitter ट्रान्सपेंरेंसी सेंटरच्या ताज्या अपडेट पाहू शकता. यामुळे अकाऊंटमधील फॉलोअर्सची संख्या कमी होऊ शकते.

- Advertisement -

ट्विटरने असेही म्हटले आहे की, ‘अकाऊंटमध्ये फॉलोअर्सची संख्या दिसत आहे. ही संख्या खरी आणि अचूक आहे यावर प्रत्येकाने विश्वास ठेवावा अशी आमची इच्छा आहे. स्पॅम आणि मॅनिपुलेशन विरुद्ध Twitter जिरो टॉलरेंस धोरण अवलंबत आहे. मशीन लर्निंग टूल्सच्या मदतीने आम्ही मोठ्या प्रमाणावर स्पॅम आणि दुर्भावनापूर्ण सामग्रीशी लढा देत आहोत. तसेच एक चांगली सेवा आणि विश्वासार्ह अकाऊंट सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहोत. यामुळेच फॉलोअर्सच्या संख्येत चढ-उतार होत आहे आणि होऊ शकतात. असे ट्विटरने म्हटले आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनीही ट्विटरच्या सीईओंना पत्र लिहून एक अहवाल पाठवला आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा डेटा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या खात्यांच्या डेटाचे विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये 8 दिवसांच्या निलंबनानंतर फॉलोअर्सची वाढ अचानक थांबल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याच काळात अन्य नेत्यांच्या फॉलोवर्सची संख्या तशीच राहिली असे म्हटले आहे.


Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनाच्या परेडदरम्यानच वळूंनी घातला धुमाकूळ, यंत्रणेची तारांबळ


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -