घरदेश-विदेशदेश घडवणाऱ्यांचा मोदींनी अपमान केला - राहुल गांधी

देश घडवणाऱ्यांचा मोदींनी अपमान केला – राहुल गांधी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र २०१४ पर्यंत देशाचा विकास झाला नाही असं म्हणतात. मोदींचं हे विधान म्हणजे देशाच्या विकासात हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचा अपमान आहे. अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तोंडावर सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की २०१४ पर्यंत भाजप सत्तेवर येईपर्यंत देशाचा विकास झाला नाही. देश निद्रावस्थेत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य म्हणजे देशाचा विकास करणाऱ्यांचा आहे. देशाच्या विकासात अनेकांनी हातभार लावला. त्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचा देखील हातभार आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र २०१४ पर्यंत देशाचा विकास झाला नाही असं म्हणतात. मोदींचं हे विधान म्हणजे देशाच्या विकासात हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचा अपमान आहे. अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. पोखरण येथे बोलत असताना त्यांनी ही टिका केली आहे. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीसाठी सध्या दोन्ही पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये जुंपल्याचं पाहायाला मिळत आहे.

 यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवाय, ‘देशका चौकीदार ही चोर है’ अशी टिका देखील केली होती. राफेल करारामध्ये अनिल अंबानी यांना ३० हजार कोटींचा फायदा करून दिल्याची टिका करत नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला होता.

- Advertisement -

२०१४ साली मोदींनी अनेक आश्वासनं दिली. त्यामध्ये रोजगार, भ्रष्टाचारासह अनेक वचनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. पण सत्तेमध्ये येताच मोदींना वचनांचा विसर पडल्याची टिका देखील यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे. दोन्ही नेते सध्या परस्परांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत.

वाचा – स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान देणाऱ्याचे नाव सांगा; कमलनाथांचे मोदींना आव्हान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -