घरदेश-विदेशRam Mandir : राम मंदिर सोहळ्यानिमित्त महिला कीर्तनकाराचा सन्मान; प्राण प्रतिष्ठेचे मिळाले निमंत्रण

Ram Mandir : राम मंदिर सोहळ्यानिमित्त महिला कीर्तनकाराचा सन्मान; प्राण प्रतिष्ठेचे मिळाले निमंत्रण

Subscribe

अयोध्येत श्री रामाची पूजा करण्याचा मान हा नवी मुंबईतील कांबळे कुटुंबाला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे यांना श्री रामाच्या पूजा करणार आहे.

अयोध्या : राम मंदिरात प्रभू श्री रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात आली आहे. रामलल्लाच्या मूर्तीचा पहिला फोटो समोर आला आहे. आता राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. या सोहळ्यासाठी आतापर्यंत देश-विदेशातील11 हजारहून अधिक लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राचा अनोखा सन्मान झाला आहे. महाराष्ट्रातील महिला कीर्तनकारास राम मंदिरासाठी निमंत्रण दिले आहे. यात महाराष्ट्रातील पाच महिला साधवीतील पुणे येथील सुप्रिया साठे ठाकूर यांना पुजेचा मान मिळाला आहे.

तसेच देशभरातील 11 दाम्पत्यांना पूजेसाठी बोलवण्यात आले आहे. यात नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याचा देखील समावेश आहे. या सोहळ्यासाठी राज्यातील महिला कीर्तनकार म्हणून पुण्याच्या खेड तालुक्यातील कीर्तनकार सुप्रिया साठे ठाकूर यांना मान मिळाला आहे. राज्यातील पाच साधवी महिलांतून त्यांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – PM Modi in Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरतात सोलापूरचे जॅकेट; पद्मशाली समाजासोबतच्या नात्याचाही सांगितला किस्सा

संतांच्या कृपेने मला मान मिळाला – सुप्रिया साठे ठाकूर

500 वर्षांपासून ज्या दिवशाची वाट आपण पाहत होतो. त्या क्षणाचे आपण साक्षीदार होणार आहे. हा माझ्यासाठी सौभाग्याचा विषय आहे. या सोहळ्यांचे आमंत्रण मिळाल्यानंतर मी खूप आनंदी झाले. ज्ञानबो, तुकाराम आणि मुक्ताईं या संतांच्या कृपेने मला हा मान मिळाला आहे, अशी भावना सुप्रिया साठे ठाकूर यांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – PM Modi Solapur : देशात पुन्हा मोदी सरकार जगाला विश्वास, तर महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार – एकनाथ शिंदे

कांबळे दाम्पत्यांना पंतप्रधानांसोबत मिळाला पूजेचा मान

अयोध्येत श्री रामाची पूजा करण्याचा मान हा नवी मुंबईतील कांबळे कुटुंबाला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे यांना श्री रामाच्या पूजा करणार आहे. देशभरातील 11 दाम्पत्यांना पंतप्रधानांसोबत पूजेचा मान मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -