घरदेश-विदेशRam Mandir : भक्ती कमी आणि मतांचा व्यापार जास्त, संजय राऊत यांचा...

Ram Mandir : भक्ती कमी आणि मतांचा व्यापार जास्त, संजय राऊत यांचा भाजपाला टोला

Subscribe

मुंबई : सन 2023 हे वर्ष फार वेगाने संपले आणि गतवर्षाने काही चांगले पेरून न ठेवल्यामुळे 2024 हे वर्ष अधिक अशांततेचे आणि देशाला व जगाला अधिक दुरवस्थेकडे नेईल असे दिसते. मोदी सरकारने पाच राज्यांत निवडणुका घेतल्या. त्यातील तीन राज्यांत मोदी पक्ष विजयी झाला. तोच उन्माद घेऊन नव्या वर्षात अयोध्येतील राममंदिराचे उद्घाटन होईल. राममंदिराचा घंटानाद घेऊन देश त्याच वातावरणात सार्वत्रिक निवडणुकांना सामोरा जाईल. शेवटी भक्ती कमी व मतांचा व्यापार जास्त असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा – “…पण आमचा महाराष्ट्र का लुटत आहात?” Sanjay Raut यांचा पंतप्रधान मोदींना संतप्त सवाल

- Advertisement -

पुढच्या चार महिन्यांत देशात सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल आणि हे सारे कशासाठी, यामधून सामान्य भारतीय माणसाचे भवितव्य कसे सुधारणार, असा चेहरा करून सामान्य माणूस महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे ओझे खांद्यावर घेऊन आपली वाटचाल कशीबशी चालू ठेवील. राजकारण्यांवरील उरलासुरला विश्वासही 2023 साली नष्ट केला, हे मान्य केले तर देशातील संसद, न्यायालये, वृत्तपत्रे यांवर विश्वास ठेवावा अशी स्थिती राहिली आहे काय? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या रोखठोक या सदरातून केला आहे.

रशियाने युक्रेन बेचिराख केले. इस्रायलने गाझापट्टीत 40 हजार लोकांना ठार केले. त्यात लहान मुले व स्त्रिया जास्त. जगभरात असे अमानुष हत्याकांड सुरू असताना ‘युनो’ने फक्त बघ्याची व इशारे देण्याचीच भूमिका बजावली. चीन, रशिया, अमेरिका युरोपियन राष्ट्रांचे संघटन युनायटेड नेशन्सना कसे दुर्लक्षित करतात ते युक्रेन आणि गाझातील नरसंहाराने दिसले. भारतात मणिपूर आणि जम्मू-काश्मिरात शेकडो निरपराध्यांचे बळी गेले व सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे युनोला तरी का दोष द्यावा? अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “राम मंदिराचे मंगल कार्यालय करून ठेवले”, Sanjay Raut यांची भाजपावर घणाघाती टीका

सरकारने मारलेल्या थापा आणि भरमसाट आश्वासनांचे ओझे घेऊन जुने वर्ष सरते आहे. नवे वर्ष उगवते आहे. भारतालाच नव्हे, तर जगाला दुरवस्थेकडे नेणारे वर्ष म्हणून 2023 हे वर्ष दीर्घकाळ लक्षात राहील. आत्ममग्न सत्ताधाऱ्यांच्या हाती भारत देशाची सूत्रे आज आहेत. त्यांच्या आत्ममग्नतेची तपस्या भंग करणाऱ्या सर्वांनाच देशाचे दुश्मन ठरवून सरळ तुरंगात टाकले जाते, अशा अवस्थेला आपण पोहोचलो. त्यामुळे नवीन वर्षात काही आशादायक घडेल काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

हेही वाचा – पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाण्यासंदर्भात CM Eknath Shinde स्पष्ट म्हणाले; “हा प्रकल्प…”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -