घरताज्या घडामोडीचक्क देवाच्या नावाने या पठ्ठयाने तयार केले रेशनकार्ड!

चक्क देवाच्या नावाने या पठ्ठयाने तयार केले रेशनकार्ड!

Subscribe

देवाच्या नावावर आजपर्यंत आपण अनेक गोष्टी खपवलेल्या ऐकल्या आहेत. अनेक खोटे किस्से देवाच्या नावावर अनेकजण सांगतात. पण राजस्थानमध्ये धौलपुर जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. इथे देवाच्या नावावर रेशन कार्ड तयार करण्यात आले आहेत. आणि देवाच्या नावावर गरीब मजदुरांकडून रेशन लुटले जात आहे.

राजस्थानच्या धौलपुर जिल्ह्यात रेशन डिलीव्हरी करणऱ्यांनी देवाच्या नावावार रेशन कार्ड बनवले. गेले तीन ते चार वर्ष देवाच्या नावावर तयार केलेल्या रेशेनकार्डवरून रेशनही घेतले जात आहे. धौलपुर जिल्ह्याकील ग्राम पंचायत मरहोली गावात हा प्रकार घडत होता. ज्या गावात एक ठाकुर मंदीर आहे. मंदिरात शालिग्राम, राम, लक्ष्मण, सीता, महादेव आणि पुजाऱ्यांच्या नावाने रेशन कार्ड तयार करण्यात आले.

- Advertisement -

जेव्हा गावातील लोकं रेशन घेण्यासाठी पोहचले तेव्हा रेशन धारकाने बायोमैट्रिकवर अंगठा लावला. नंतर सांगितलं तुमचा अंगठा मिळत नाहीये. त्यामुळे तुम्हाला रेशन नाही मिळणार. त्यानंतर गावातील काहीजण सेंटरवर पोहचले. जीथे त्यांनी रेशन कार्ड बघितले असता त्यांना समजले की देवाच्या नावार रेशन कार्ड बनवण्यात आले आहे.

यानंतर गावातील लोकांनी ई मित्र सेंटर मधून मंदिराचे नान असणारी रेशन कार्डाची कॉपी घेतली. देवाच्या नावावर असणारे रेशन कार्ड बघून जिल्हाधीकाऱ्यां पण धक्का बसला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकारणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

गावकऱ्यांनी आरोप लावले आहेत की, रेशन डिलरने निनुआ राम, शीलादेवी, लोकेश आणि रमाकांत शर्मा या नावावर रेशन कार्ड बनवले. यामुळे आता दुसरे रेशन डिलरही अशाच प्रकारचा घोटाळा करतील.


हे ही वाचा – अखेर आपल्या प्रिय मित्राबद्दल बोलले अमिताभ बच्चन!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -