घरदेश-विदेशसलग दोन दिवस रुग्ण बरे होण्यात विक्रमी वाढ, ८२ हजारपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

सलग दोन दिवस रुग्ण बरे होण्यात विक्रमी वाढ, ८२ हजारपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

भारतामध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना बरे होणार्‍या रुग्णांनी दोन दिवसांपासून विक्रमी आकडा गाठला आहे. सलग दोन दिवस भारतामध्ये तब्बल  ८२ हजारांपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मागील २४ तासात ८२ हजार ९६१ सक्रिय रूग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.

कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना भारतामध्ये बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बरे होणार्‍या रूग्णांच्या राष्ट्रीय सरासरीत वाढ होऊन ती ७८.६४ टक्के इतकी झाली आहे. आतापर्यंत ४० लाख २५ हजार ७९ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सक्रिय रूग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रूग्णांची संख्या ३० लाख १५ हजार १०३ इतकी असून सक्रीय रुग्णांच्या तुलनेत बरे होणार्‍या रुग्णांची संख्या चार पटीने जास्त आहे. ३० दिवसांतील बरे झालेल्या रूग्णांच्या सरासरीतही १०० टक्के वाढ झाली आहे. बरे झालेल्या एकूण रूग्णांपैकी १७ हजार ५५९ (२१.२२ टक्के) रूग्ण महाराष्ट्रातील असून त्याखालोखाल आंध्र प्रदेशमधले १०,८४५, कर्नाटकमधले ६५८०, उत्तर प्रदेशमधले ६४७६ आणि तामिळनाडूमधील ५७६८ असे ३५.८७ टक्के रूग्ण बरे झाले आहेत. या सर्व राज्यांमधील ५७.१ टक्के रूग्ण बरे झाले आहेत. आजच्या स्थितीला देशातील सक्रिय रूग्णांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यातील सुमारे निम्मे सक्रिय रूग्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये आहेत. तर या राज्यांबरोबरच उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू अशा पाच राज्यांमध्ये सुमारे ६० टक्के सक्रिय रूग्ण आहेत.

- Advertisement -

देशभरात गेल्या २४ तासात कोरोना संसर्गामुळे ११३२ जण दगावले आहेत. यात महाराष्ट्रातील ४७४ जणांचा समावेश असून दगावलेल्या रूग्णांपैकी ४० टक्क्यांपेक्षा जास्त रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेश (८६), पंजाब (७८), आंध्र प्रदेश (६४) आणि पश्चिम बंगाल (६१) अशा चार राज्यांमधील २५.५ टक्के रूग्ण गेल्या २४ तासांत दगावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -