घरताज्या घडामोडीRepublic Day: प्रजासत्ताक दिनी यंदा परंपरेत बदल, राजपथावर काय-काय खास होणार?

Republic Day: प्रजासत्ताक दिनी यंदा परंपरेत बदल, राजपथावर काय-काय खास होणार?

Subscribe

देश आज ७३वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावर होणाऱ्या सर्व सोहळ्याची तयारी झाली आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने होणारे परेड आणि फ्लाईपास्ट प्रदर्शन राजपथावर अर्धा तास उशिरा म्हणजे साडे दहा वाजता सुरू होणार आहे. दरवर्षी हा कार्यक्रम सकाळी १० वाजता सुरू होत. तसेच कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परदेशी प्रमुख पाहुणे उपस्थितीत राहणार नाहीत.

प्रजासत्ताक दिनाच्या विशेष कार्यक्रमात भारतीय हवाई दलाचे ७५ विमानांच्या भव्य फ्लाई-पास्ट केला जाईल. याशिवाय स्पर्धात्मक प्रक्रियेतून निवडलेले ४८० स्पर्धक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रमस्थळापासून दूरवर बसलेल्या लोकांना कार्यक्रम पाहण्यासाठी प्रत्येक ७५ मीटर अंतरावर १० मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. दरम्यान परेडमध्ये फक्त दोन डोस घेतलेल्या प्रौढांना आणि एक डोस घेतलेल्या १५ वर्षांहून अधिक वयोगटातील मुलांना प्रवेश करण्यास परवानगी दिली गेली आहे. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे आणि सर्व नियमांचे पालन बंधनकारक आहे. कोरोनामुळे यावर्षी प्रेक्षकांची संख्या कमी करण्यात आली आहे. फक्त ५ ते ८ हजार प्रक्षेक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. गेल्या वर्षी १५ हजार लोकांनी परेड पाहिली होती.

- Advertisement -

यंदा परेडाचा मार्ग देखील कमी केला आहे. पहिल्यांदा हा मार्ग ८.३ किलोमीटर होता, जो आता कमी करून ३.३ किलोमीटर केला आहे. जरी ५ किलोमीटर मार्ग कमी केला असला तरी परेड लाल किल्लाजवळ जाऊ संपेल. यावर्षी परेडमध्ये कोणतेही परदेशी पाहुणे उपस्थितीत राहणार नाहीत. सरकारने पाच मध्य आशियाई देशांच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रण पाठवले होते, परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे ते रद्द करण्यात आले.

विशेष म्हणजे यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात समाजातील ज्या लोकांना सहसा परेड पाहायला मिळत नाही, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ऑटो रिक्षा चालक, कामगार, सफाई कर्मचारी आणि फ्रंटलाईन, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या काही विभागांना ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.

- Advertisement -

राजपथावर दिसणार या खास गोष्टी

१९६५ आणि १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात वापरले गेलेले हत्यारे आणि उपकरणे दाखवली जाणार आहेत.

जुनी वाहने, तोफाखान हे भारतीय सैन्याने गेल्या दशकात लढलेल्या युद्धाचे प्रतीक असेल.

तसेच जुनी उपकरणे, शस्त्रे आणि तंत्रज्ञान बदलण्यासाठी नव्या गोष्टी देखील प्रदर्शित केल्या जातील.

यंदा प्रजासत्ताक उत्सव आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यांचा अनोखा मेळ ही परेड असेल.


हेही वाचा – बिपीन रावत, कल्याण सिंह , प्रभा अत्रे ,राधेश्याम खेमका यांना पद्मविभूषण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -