राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा (North India Cold Wave) कहर काही कमी होताना दिसत नाहीये. जानेवारी महिना संपण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत, तरीही थंडीचा कहर कमी होत नाहीये. हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे की, येणाऱ्या काही दिवसांपर्यंत अशीच थंडी उत्तर भारताच्या काही राज्यांमध्ये असणार आहे. आयएमडीने दिल्लीसह देशाच्या काही भागात आज, बुधवारी ‘कोल्ड डे’ अलर्ट जारी केला आहे. तर पंजाब, हरयाणासह काही राज्यात सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा कहर असणार आहे, ज्याचा परिणाम लोकांवर होणार आहे.
दिल्लीत आज कसे असणार हवामान?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये आज किमान तापमान ७ डिग्री सेल्सिअस राहू शकते. तर कमाल तापमान १५ डिग्री सेल्यिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने ‘कोल्ड डे’ अलर्ट जारी केला आहे. तसेच दिवसभरात आभाळ साफ राहण्याचा अंदाज आहे. चंदीगडमध्ये आज किमान तापमानात घट १० डिग्री सेल्सिअस आणि कमाल तापमान १७ डिग्री सेल्सिअस असू शकते. सकाळी आणि संध्याकाळी धुके असणार आहे. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये आजचे किमान तापमान ८ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान १९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
कोणत्या शहारात अपेक्षित किती तापमान?
शहर किमान तापमान कमाल तापमान
दिल्ली ७.० १४.०
श्रीनगर -०.० १०.०
अहमदाबाद १०.० २५.०
भोपाळ ८.० २०.०
चंदीगड १०.० १७.०
डेहराडून ८.० १९.०
जयपूर ७.० २०.०
चुरू ६.० १९.०
मुंबई १४.० २६.०
लखनौ ८.० २०.०
गाझियाबाद ९.० १७.०
जम्मू ५.० १८.०
लेह -१४.० -३.०
पाटणा १३.० २२.०