घरदेश-विदेशRussia - Ukraine war : खिश्यातील मोबाईलमुळे वाचले युक्रेन सैन्याचे प्राण, पाहा...

Russia – Ukraine war : खिश्यातील मोबाईलमुळे वाचले युक्रेन सैन्याचे प्राण, पाहा Video

Subscribe

युक्रेनच्या एका सैनिकाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये खिशात ठेवलेल्या मोबाईलमुळे त्याचा जीव वाचल्याचे दिसते. रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दोन्ही देशांचे सैनिक शौर्याने आणि धैर्याने लढत आहेत. अशात युद्धभूमीवर युक्रेनच्या एका सैनिकावर रशियन सैनिकांनी गोळीबार केला. मात्र 7.62 एमएमची बुलेट खिशात ठेवलेल्या मोबाईलमध्ये जाऊन अडकली, ज्यामुळे त्या सैनिकाचा जीव वाचला. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये युक्रेनियन सैनिक त्याचा बुलेटमुळे फुटलेला फोन दाखवत आहे. या फोनमध्ये रशियन सैन्याने बंदुकीतून सोडलेली बुलेट अडल्याचे तो दाखवतोय. यात तो सैनिका सांगितोय की…”मोबाईलमुळे माझा जीव वाचवला”

- Advertisement -

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सैनिक आपल्या सहकारी सैनिकाशी बोलत असताना आनंदाने आपला मोबाईल दाखवताना दिसत आहे. गोळीबाराच्या आवाजात युक्रेनच्या सैनिकांनी हा व्हिडिओ बनवला आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे की, पूर्व युक्रेनवर रशियाच्या आक्रमणामुळे युद्ध अपरिहार्यपणे हिंसक, रक्तरंजित आणि विध्वंसक झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना, गुटेरेस यांनी गुरुवारपासून सुरू होणार्‍या आणि रविवारी इस्टर (24 एप्रिल) संपणार्‍या चार दिवसांच्या पवित्र आठवड्यात हल्ल्याला मानवतावादाच्या आधारे थांबवण्याची मागणी केली, जेणेकरून मानवतावादी कॉरिडॉर उघडता येतील.

- Advertisement -

युक्रेनमध्ये युद्धविरामासाठी अनेक बाजूंनी केलेले प्रयत्न अयशस्वी झाल्याबद्दल यावर नाराजी व्यक्त केली. तसेच गुटेरेस म्हणाल्या कीस चार दिवसाच्या ईस्टर कालावधीत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी एकजूट होण्यासह युक्रेनवरील हे युद्ध समाप्त करण्यासाठी संवाद वाढवायला हवा. अशी आशा व्यक्त केली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -